कंगणाची ट्विटरवर दमदार एंट्री, सुरू केले स्वतःचे अकाऊंट


आपल्या बिनधास्त आणि बेधडक वक्तव्यामुळे सगळ्यानाच परिचयाची झालेली बॉलीवूडची क्वीन अर्थात कंगणा राणावतने अद्याप स्वतःहून कधी आपले सोशल मीडिया अकाऊंट उघडले नव्हते. पण तिचे विचार, मत सर्वकाही ट्विटरवर टीम कंगना राणावतच्या माध्यमातून जनतेसमोर यायचे. पण आता तिने सोशल मीडिया वापराबाबतही आपले ठाम मत मांडत टीम कंगणा राणावत व्यतिरिक्त स्वतःचे ट्विटर अकाऊंट सुरू करत ट्विटरवर दमदार एंट्री घेतली आहे.

सध्याचा काळ हा सोशल मीडियाचा असल्यामुळे सोशल मीडियाकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही आणि हीच सोशल मीडियाची ताकद सुशांतच्या मृत्युनंतर पाहायला मिळाली. कोण्या एका कलाकाराच्या मृत्युवर पहिल्यांदाच जनेतेने एकजूट होऊन एवढ्या मोठ्या प्रमाणावर आवाज उठवला आहे. जगाच्या कानोकप-यातून यावर सोशल मीडियामुळे बोलले जात आहे. यापूर्वीही अशा घटना घडायच्या, लोक बोलायचे पण आपले मत आणि विचार पोहचण्यासाठी कोणत्याही प्रकारचे सशक्त असे माध्यम नव्हते.

आज प्रत्येक व्यक्ती सोशल मीडियामुळेच आवाज उठवू लागला आहे. हे खूप सकारात्मक ऊर्जा देणारे असल्याचेही तिने म्हटले आहे. सोशल मीडियाने आपण एकत्र येऊन लढा दिल्याने सगळे काही शक्य आहे हेच दाखवून दिले आहे. म्हणूनच तिने ट्विटरवर पदार्पण केल्याचे म्हटले आहे. सोशल मीडियावर मी कधीच इतरांप्रमाणे सक्रीय नव्हती. कधीच चाहत्यांशी संवाद साधला नाही. कारण मी माझे विचार चित्रपटाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचवले असल्याचे मला नेहमी वाटायचे. पण आता काळ बदलला आहे, त्यामुळे त्यानुसार बदलावेच लागेल. कामाव्यतिरिक्तही सोशल मीडियाचा योग्य वापर आपण करू शकतो. म्हणूनच मला सोशल मीडियाची आज किंमत कळाली. आज सोशल मीडियापेक्षा अधिक कोणतेही प्रभावी माध्यम नाही. म्हणूनच आजपासून मी थेट ट्विटरवर उपलब्ध राहणार असल्याचे तिने म्हटले आहे.