गणेशोत्सवाचा ज्ञात इतिहास


लोकमान्य टिळक यांच्या प्रेरणेने सार्वजनिक गणेशोत्सव ठिकठिकाणी सुरू झाल्यावर एका कार्यक्रमात लोकमान्यांनी ‘हा गणेशोत्सव एक दिवस ऑलिंपिकच्या बरोबरीने जगभर साजरा होईल असे बोलून दाखविले होते. त्याचे त्यांनी असे कारण दिले होते की, आलिंपिक हाही एका देवतेचा उत्सव आहे. जगातील तरुण क्रिडापटू त्यांच्या तपश्चर्येचे आणि कौशल्याचे कसब दाखवून त्या रोममधील देवतेची आराधना करतात, त्याच प्रमाणे गणेश ही विद्यादेवता येणार्‍या काळात सार्‍या जगाची प्रेरणा देवता होईल.जगभर ज्या प्रमाणात हा उत्सव पसरत आहे ते पाहिले तर तोही दिवस दूर नाही, असे आज म्हणता येईल

गणेशपूजा आणि गणेशोत्सव पूजा यात महत्वाचा फरक असा की, गणेशोत्सव पूजा ही व्यक्तिगत असू शकते पण गणेशोत्सव ही प्रकि‘या सार्वजनिक असते. गेल्या सव्वाशे वर्षात गणेशपूजेला सार्वजनिक गणेशोत्सव पूजेचे रुप आले. व्यक्तिगत पातळीवर गणेशपूजा शरीराच्या मूलाधारचक्रावर आधारित असते तर सार्वजनिक गणेशोत्सवातील गणेशपूजा समाजाच्या मूलाधारावर उभी असते. विसाव्या शतकात स्वातंत्र्योत्तर काळात गणेशोत्सवात काही रोंबासोंबा प्रकार आले असे मानले तरी मूळ सार्वजनिक गणेशोत्सवाने स्वातंत्र्य चळवळीला एक निष्ठेचा मूलाधार मिळाला.

जगात सध्यातरी असे एकही शहर नाही, की तेथे सार्वजनिक गणेशोत्सव साजरा होत नाही. ही सारी वाढ प्रामु‘याने गेल्या पंचवीस वर्षातील आहे. सर्वसाधारणपणे आजपर्यंत असा अनुभव आहे की, कोठेही प्रथम महाराष्ट्रीय कुटुंबात प्रथम गणेशोत्सव सुरु होतो नंतर त्या त्या भागात प्रत्येक भारतीय मंडळांत हा उत्सव सुरु राहतो. देशाच्या फार मोठया भागात गणेशोत्सव हा जवळजवळ राष्ट्रीय महोत्सव म्हणूनच साजरा होतो, त्यात महाराष्ट्र कर्नाटक केरळ गोवा गुजरात, मध्यप्रदेश, आंध्र, आणि तामीळनाडू या राज्यांचा समावेश आहे. हा गणेशोत्सव सुरू होण्यास लोकमान्यांची प्रेरणा कारणीभूत आहे, हे स्पष्ट आहे.

शिवाजी महाराजांनी बालवयातच 1636 साली पुण्यात पहिला गणेशोत्सव सुरू केला त्याची वाढ ‘प्रतिपश्चन्द्ररेखेव ’सतत वाढतच राहिली. पण गणेशोत्सवाचा एवढा विस्तार होण्यात लोकमान्य टिळक वा छत्रपति शिवाजी महाराज यांची जेवढी निर्णायक भूमिका आहे, तेवढीच निर्णायक भूमिका विजापूरचा इ.स. 1579 ते 1627 दरम्यान गादीवर असलेला इब्राहीम दुसरा आदिलशहा याची आहे. वास्तविक विजापूरची आदिलशाही ही दीर्घकाळ मूर्तिभंजनासाठी प्रसिद्ध आहे. तरी दुसरा इब्राहीम आदिलशहा यांची गणेशोत्सवाच्या वाढीतील सिंहाचा वाटा दुलर्र्क्षण्यासारखा नाही कारण तो देवी सरस्वती आणि ओंकारमूलक गणपती या विद्येच्या दैवतांना आपले आई वडील मानत असे.

अठठेचाळीस वर्षे आदिलशाहीवर असलेल्या दुसर्‍या इब्राहिमने स्वत:च्या प्रत्येक पत्राची सुरवात सरस्वती आणि गणपती यांच्या वंदनाने केली आहे. अनेक मुसलमान सरदार हे भारतीय दैवतांचे उल्लेख आपल्या कागदपत्रात पूज्य भावनेने करत असत. असे करणे येथे लोकप्रीय होण्यास उपयोगी ठरणारे वाटल्याचेही कारण असेल. कारण कसबा गणपतील 120 एकर जमीन देणारा इब्राहीम बादशहा आणि त्याचा पुढील पिढीतील बादशहाने मात्र ते मंदीर तर उजाड केलेच पण त्यावेळच्या गणेश चौकात गाढवाचा नांगर फिरवला. त्या मंदिराची पुनर्स्थापना जिजामातांच्या प्रेरणेने झाली. शिवकालातील परंपरेतून लोकमान्याच्या काळात गेलेला गणेशोत्सव हे दोन्ही पुण्यातील असले तरी तो प्रवास मात्र दूरवरचा आहे. लालमहालातून किंवा शनिवार वाडयातून हा गणेशोत्सव दगडू हलवाई मंडळ किंवा लोकमान्यांच्या गायकवाडवाडा येथे तो ग्वाल्हेरमार्गे आला आहे. लाल महालापासून गायकवाड वाडा किंवा दगडू हलवाई गणपती ही जागा एक किलोमीटरच्या आत आहे. तरी प्रवास 100 वर्षाचा आणि अडीच हजार किलोमीटरचा आहे.

त्या कसबा गणपतीला पूजेसाठी एकशेवीस एकर जमीन दिल्याचे बादशाही फर्मान आज उपलब्ध आहे. हे फर्मान कोणा सरदाराची देणगी नाही ते शाही फर्मान आहे. नंतर या द‘खन च्या पठाराच्या विकासात महतवाची भूमिका बजावणार्‍या मलिकअंबरनेही कसबा गणपती त्यावेळच्या भाषेत (मोरेस्वर देव) या दैवताची उपासना करण्यासाठी विशेष काळजी घेतली होती. शहाजी महराजांनीही त्यांच्या परगण्यातील दैवत म्हणून त्याची काळजी घेतली होती. इतिहास संशोधक निनाद बेडेकर यांनी या संदर्भात अनेक पुराव पुढे मांडले आहेत. गणपतीला सार्वजनिक गणेशाचे जे रूप मिळाले त्याला ग्वाल्हेरचा गणपती अधिक कारणीभूत आहे. 1891 च्या सुमारास पुण्याचे वैद्य खासगीवाले ग्वाल्हेर येथे गेले असताना तेथे सार्वजनिक ठिकाणी होणार्‍या गणेशपूजेमुळे ते प्रभावित झाले.

मोठमोठया वाडयात चौकात होणारे शास्त्रीय मनोरंजनाचे मेळे, नाटके, भाषणे, प्रवचने, हे कार्यक‘म त्यांना अतिशय आवडले. हा उपक‘म पुण्यात सुरु करावा आणि त्यासाठी लोकमान्यांची मान्यता मिळवावी ,असे त्यांना वाटले. एकोणिसाव्या शतकातील शेवटची 15-20 वर्षे पुण्यात ‘ टिळकवर्षेच ’ मानली गेली होती. प्रत्येक गोष्टीवर लोकमान्य कसा विचार करतील असा विचार करण्याची तरूणांच्यात एक प्रवृत्तीच निर्माण झाली होती. वैद्य खासगीवाले यांनी गणेशोत्सवाची ही कल्पना त्यांचे समवयस्क मित्र दगडू हलवाई, भाउ रंगारी, आदि मंडळींना सांगितली. हा विषय आपण टिळक यांना सांगू अशी कल्पना पुढे आली. पण ‘‘ आधी केले मग सांगितले ’’ या विषयावर लोकमान्यांचे नुकतेच भाषण झाले होते.

अर्ध्या दमडीची अफू घेतली की राष्ट्रोद्धाराच्या शेकडो कल्पना सुचतात पण त्यातील एखादी राबवणेही कठीण असते, असे निराळ्या एका प्रसंगाने त्यांनी सांगून झाले होते म्हणून या मंडळीनी ‘प्रथम सार्वजनिक गणपती बसवले, कांही कार्यक्रम ठरविले आणि नंतर ते लोकमान्यांना भेटायला गेले. लोकमान्य तेंव्हा विंचूरकर वाडयात रहात असत. त्यांना सार्वजनिक गणेशोतसवाची कल्पना अतिशय आवडली विसर्जनाच्या मिरवणूकीला आपण स्वत: येउ असे त्यांनी सांगितले. आणि त्यादिवशी सध्याच्या नगरकर तालीम चौकापासून सध्याच्या विजय टॉकीज चौकापर्यंत ते त्या मिरवणुकीत होते. गणेशविसर्जनाच्या मिरवणुकीत लोकमान्य आल्याची बातमी आजूबाजूच्ला वार्‍यासरशी पसरली आणि पुढे प्रचंड गर्दीही झाली.

मिरवणुकीतून परत आल्यावर त्यांचे स्वीय सचीव धोडोपंत विद्वांस यांना त्यांनी डेस्कवर दौत टाक घेउन बसण्यास सांगितले. विंचुरकरवाडयाच्या पहिल्या मजल्यावरील त्या 3 0 फूट लांब दालनात येरझार्‍या घालण्यास सुरवात केली, आणि धोंडोपंथांना म्हणाले, ‘‘ घ्या ! या आठवडयाचे संपादकीय,

‘‘आपले राष्ट्रीय उत्सव ’’

त्यांच्या त्या संपादकीयाने स्वातंत्र्य चळवळीत एक अध्यायच सुरू झाला गणेश मंडळाच्या निमित्ताने लोक एकत्र येउ लागले आणि त्यातून स्वातंत्र्य चळवळीचे अनेक उपक्रम उभे राहिले.

लोकमान्य एक शब्द बोलले आणि त्यातून एक चळवळ उभी राहिली. असे होवू शकते का, याचा अंदाज आज करता येणार नाही. पण लोकमान्यांनी एखादा शब्द बोलावा आणि त्याचा इतिहास व्हावा, असे त्या काळी अनेक बाबीत झाले होते.

ज्या एका वाक्यामुळे ते देशाचे अनभिषित नेते झाले तेही असेच प्रभावी होते. गणेशोत्सवाप्रमाणे हाही प्रसंग तेवढाच स्पृहणीय आहे. अर्थात हा प्रसंग गणेशोत्सवाच्या प्रारंभानंतर 14 वर्षांनी घडलेला आहे. लोकमान्यांचे सामर्थ्य लक्षात यावे म्हणून त्याचा येथे उल्लेख करत आहे.

सन 1904 मध्ये लॉर्ड कर्झनने हिंदू मुस्लिमात फूट पाडण्याच्या तत्वावर बंगालची फाळणी झाहीर केल्यावर बंगालमध्ये संतापाची लाट आली सारा बंगाल पेटला. त्या चळवळीला राष्ट्रीय रुप देण्याचेकाम लोकमान्यांच्या एका वाक्याने केले.

लोकमान्य म्हणाले, ‘‘ हा वंगभंग नाही हा भारत भंग आहे.’’ या वाक्यामुळे पंजाबपासून मद्रासपर्यंत सर्वत्र बंगालच्या फाळणीच्या विरोधात आंदोलन उभे राहिले. बंगालमधील चळवळीला प्रथम महाराष्ट्रातून आणि नंतर प्रत्येक प्रातांतून प्रतिसाद मिळाला त्यातूून बंगालमधील प्रत्येक माणूस शहारला.त्याचाच परिणाम म्हणजे काही दिवसानंतर लोकमान्यांच्या स्वागताचा प्रचंड मोठा कार्यक‘म आयोजित झाला. त्या प्रचंड सभेत लोकमान्य येत असताना रविंद्रनाथ टागोर यांनीही अशाच प्रभावी शब्दात त्यांचे वर्णन केले. हजारो लोकांच्या मधून लोकमान्य सभास्थानाकडे जात होते. त्यावर रविंद्रनाथ एवढेच म्हणाले,

‘‘ हा तर शिवाजी ’’ या एका जादुई शब्दाचा परिणाम म्हणजे स्वातंत्र्य चळवळीत केवळ महाराष्ट्र आणि बंगाल एकत्र आले किंवा त्याच बरोबरीने पंजाबही त्यात आला असे नव्हे तर प्रत्येक प्रंात सहभागी झाला. वंगविरोधाची चळवळ हा कांही गणेशोत्सवाचा भाग नव्हता पण एकदा निर्माण झालेले स्फुलिंग प्रत्येक ठिकाणी आपला ठसा उमटवत असले. त्याचे ते उदाहरण होते.

याच काळातील गणपतीबाबत अजून एक संदर्भ महत्वाचा आहे. तो लोकमान्य टिळकांच्या काळातील असला तरी त्यांना निराळे महत्व आहे. तो म्हणजे गणेश या दैवताबाबत ज्ञानकोशकार श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी या दैवताबाबत केलेला उल्लेख. त्यांनी 1900 ते 1915 या काळात असे लिहून ठेवले आहे की, अजून स्वातंत्र्य मिळायला किती वेळ लागेल हे सांगता येत नाही. पण जेंव्हा स्वातंत्र्य मिळेल तेंव्हाच्या तरुण पिढीने ‘बृहद् भारताच्या सीमा निश्चित कराव्या.’ त्या सीमा निश्चित करण्याचे सूत्र असे की, जेथे म्हणून गणपती हे दैवत पोहोचले आहे, तेथे बृहद् भारताच्या चतुस्सीमांच्या खुंट्या ठोकाव्यात. विदेशातही जेथे आज गणपती आहे तेथे एकेकाळी बृहद्भारत विस्तारला होता, हे लक्षात घ्यावे. सध्याच्या पारतंत्र्याच्या काळात हे खरे वाटणार नाही व स्वातंत्र्य मिळाल्यावरही लगेच याची प्रचीती येणार नाही पण त्या पुढील शंभर वर्षात हे स्पष्ट होणार आहे.
अनेक परंपरांबाबत अशी स्थिती दिसते की, त्याचा त्या काळातील हेतू विस्मरणात जातो. आणि नंतर फक्त काही ठोकळेबाज कर्मठता शिल्लक राहते. त्या त्या वेळी ज्या बाबी शिल्लक राहतात त्यातूनच त्याचे स्वरुप लक्षात घेतले जाते फारसा मागे जाण्याचा त्रात घेतला जात नाही. पण सार्वजतिक गणेशोत्सवाचे स्वरुप व्यापक होत असल्याने याबाबीकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

ˆ: मोरेश्वर जोशी, पुणे

1 thought on “गणेशोत्सवाचा ज्ञात इतिहास”

 1. महेश कदम

  सुखकर्ता दुःखहर्ता……ही गणपतीची आरती संपूर्ण महाराष्ट्रात म्हंटली जाते.हि आरती समर्थ रामदास स्वामी यांनी रचली आहे.गणपतीची संकष्टी चतुर्थी करणारा गणेशभक्त प्रत्येक घराघरांत असणारच. देवादिकांसह संतांनी देखील सर्व कार्यात गणपती प्रथम पूजला आहे.भाद्रपद शु. ४ ते भाद्रपद शु.१४ हा गणेशोत्सवाचा कालावधी आहे.प्रचलीत गणेशोत्सवाच्या पूर्वी श्री समर्थ रामदास स्वामींनी हा उत्सव सुरू केल्याची नोंद इतिहासात आहे.

  समर्थे सुंदरमठी गणपती केला !
  दोनी पुरुष सिंदूर वर्ण अर्चिला !!
  सकळ प्रांन्तासी मोहछाव दावीला !
  भाद्रपद माघ पर्यंत !!
  समर्थ रामदास स्वामी हे दासबोधाचे लिखाण करण्याकरिता शिवथरच्या घळीत आले.दहा वर्षाचे शिवथर घळीचे वास्तव्य पूर्ण झाले तेव्हा १६५८ साली समर्थ नाशिकला कुंभमेळ्याला जाण्याकरिता शिवथरच्या घळीतून बाहेर पडले. त्यावेळी आनंद संवत्सर सुरू होते. घळीत असताना त्या॑नी महाराष्ट्रावर अफजलखान नावाचे एक विघ्न चालुन येत आहे हि बातमी ऐकली. महाराष्ट्रभर संचार करणाऱ्या समर्थांच्या शिष्यांनी हि वार्ता त्यांच्या कानावर टाकली.त्यावेळी अष्टविनायकांतला पहिला गणपती ज्याचे नाव वक्रतुंड आहे. त्याची स्तुति करून हि प्रार्थना केली.तीच हि गणपतीची सुप्रसिद्ध असणारी आरती.
  या आरतीच्या पहिल्या चरणात अफजलखानाच्या स्वारीचा उल्लेख आपणांस स्पष्ट आढळतो.
  वार्ता विघ्नाची नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची !
  हा सुंदरमठ शिवकालीन शिवथर प्रांतात आहे.याचा उल्लेख छ्त्रपती शिवाजी महराजांच्या अस्सल मोडी पत्रात आढळतो.त्याच प्रमाणे श्री समर्थ सेवक कल्याण स्वामी यांच्या पत्रात तसेच श्री समर्थ रामदास स्वामी आणि शिवराय यांच्या मध्ये असणारा दुवा समर्थ शिष्य महाबळेश्वरकर भट यांच्या ही पत्रात आढळतो.तोच हा सुंदरमठ ज्याचे हल्लीचे प्रचलित नाव रामदास पठार असे आहे. शिवकालीन सुंदरमठाशी असणारी सर्व ऐतिहासिक कागद पत्रांचे पुरावे हया स्थानाशी तंतोतंत जुळून येतात. इथेच सन १६७५ साली छ. शिवाजी राजे आणि समर्थ रामदास स्वामी दोघांनी मिळून हा गणेशोत्सव भाद्रपद शु. !!४ ते माघ शु.!! ५ गणेश जयंती पर्यंत पाच महीने साजरा केला. हा गणपती कोणत्याही मंडळाचा राजा नाही तर हा हिंदवी स्वराज्य संस्थापक छ. शिवाजी राजांचा गणपती आहे.
  या गणेशोत्सवाचे पहिले वर्गणीदार राजे शिवछत्रपती आहेत. ज्यांनी त्या साली १२१ खंडी धान्य हया उत्सवाला देणगी दिली . त्याचा उल्लेख इतिहासात खाली दिलेल्या लेखात सापडतो .
  समर्थे शिवराजासी आकारामुष्ठी भिक्षा मागो धाडिली ! शिवराज म्हणे समर्थे माझी परीक्षा मांडली !!
  आकारा आकरी खंडी कोठी पाठविली !
  हनुमान स्वामी मुष्ठी लक्षुनिया!!
  ११ x ११ म्हणजे १२१ एवढे खंडी धान्य राजांनी या उत्सवाला दान दिले. या पाच महीने सुरू असणाऱ्या उत्सवाला भेट देऊन गणपतीचे दर्शन विजयादशमीच्या दिवशी घेतले असे आनंदवनभुवन या समर्थ रचित काव्यात उल्लेखले आहे. हा गणेशोत्सव श्री समर्थ रामदास स्वामींच्या साक्षात्काराचा अनुभव आहे. श्री गणपतीच्या आरतीच्या शेवटच्या चरणात रामदास स्वामींनी गणपतीला अफजलखानाच्या या स्वराज्यावर आलेल्या संकटांपासून शिवाजी राजांना सहीसलामत सोडवावे अशी प्रार्थना केलीली आहे.पहा…..
  दास रामाचा वाट पाहे सदना !
  संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सूरवरवंदना !!
  शिवाजी राजांनी या गणेशोत्सवाला सुंदरमठावर जेव्हा भेट दिली त्यावेळी रामदास स्वामी यांनी १८ वेगवेगळ्या प्रकारची शस्त्र महराजांना प्रसाद भेट दिली आणि महाराजांनी एक पांढरा घोडा समर्थांना दिला.गणपतीची आरती १६५८ ला समर्थांनी प्रार्थनापूर्वक लिहिल्यानंतर समर्थ शिवाजी राजांना राज्याभिषेक होई पर्यंत सन १६७४ पर्यंत थांबले, नंतर १६७५ ला गणेशोत्सव केला आणि १६ सप्टेंबर १६७६ ला सज्जनगडावर वास्तव्यकरिता गेले. हाच महाराष्ट्रातील पहिला गणेशोत्सव जो स्वराज्य निर्माण झाल्यानंतर छ. शिवाजी राजे आणि समर्थ रामदास स्वामी यांनी सुरू केला.
  आज महाराष्ट्रात प्राचीन सार्वजनिक गणेशोत्सवाचे जे पुरावे सापडतात ते हया उत्सवानंतरचे आहेत. हा उत्सव सुंदरमठ रामदास पठारावर पुन्हा नव्याने पाच दिवसाचा सुरू झाला असून या उत्सवातून प्रेरणा घेऊन श्री क्षेत्र शेंदूरमळई हे गुरुकुल येथेही हा उत्सव सुरू झाला आहे. आपण आपल्या सार्वजनिक गणेशोत्सवात ही माहिती जरूर पुरवावी.वरील संशोधन सद्गुरू अरविंदनाथ महाराज यांनी केले असून हया माहितीचे सर्व अधिकार राखीव आहेत. या माहितीचा संबंध कोणत्याही जात, धर्म ,पंथ ,सांप्रदाय ,पक्ष ,संघटना यांच्याशी नाही.
  रामदास पठार – सुंदरमठावर येण्याकरीता महाड-पुणे रस्त्यावर वरंधाघाटात माझेरी जवळ कमानी खालून डाव्या हाताने सरळ पुढे कि.मी. मठाच्या माळावर शेवट पर्यंत डांबरी रस्त्याने यावे.निवास, भोजन व्यवस्था पूर्व सूचना दिल्यास विनामूल्य होऊ शकते

Leave a Comment