मुंबई – देशातील आणखी चार बँकांना खासगी हातात सोपवण्याची वेगवान प्रक्रिया केंद्र सरकारने सुरु केली असू यासंदर्भातील निर्देश पंतप्रधान कार्यालयातील अधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्याचबरोबर याला या संपूर्ण प्रकरणाची माहिती असलेल्या अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे.
देशातील आणखी चार सरकारी बँकाचे होणार खासगीकरण
सरकार पंजाब अँड सिंध बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, युको बँक आणि आयडीबीआय बँकेत आपली हिस्सेदारी विकू इच्छित आहे. या बँकांची हिस्सेदारी विकून सरकार कोरोना विषाणूमुळे कर संकलनातील तोट्याची भरपाई करू इच्छिते. काही अन्य बँकांमध्येही यासाठी सरकारी हिस्सेदारी विकली जाऊ शकते. वित्त मंत्रालयाला पीएमओने पाठवलेल्या पत्रात या वित्त वर्षात चारही बँकांची खासगीकरण प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगितले आहे. असे असले तरी केंद्र सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिली नाही.