सुशांतच्या ‘सर्वोच्च’ निकालानंतर नितीश कुमार यांची पहिली प्रतिक्रिया


पाटना – महाराष्ट्र सरकार आणि बिहार सरकार सुशांत सिंहच्या आत्महत्येच्या तपासावरुन आमने सामने आले होते. बिहार पोलिसांनी सुशांत प्रकरणी मुंबईत येऊन तपास करण्यावरुन अनेक आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. दरम्यान सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत पाटणा येथे दाखल झालेला एफआयआर योग्य असल्याचे न्यायालयाने सांगितले. तसेच सीबीआयकडे सुशांत सिंह प्रकरणाचा तपास सोपवण्याचा आदेश दिल्यानंतर एनडीटीव्हीशी बोलताना बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पाटणा येथे रिया चक्रवर्तीविरोधात दाखल झालेल्या गुन्ह्याची तपासणी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयला परवानगी दिल्यामुळे सुशांतच्या कुटुंबाला न्याय मिळेल, असा आम्हाला विश्वास आहे. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे यामध्ये कोणताही राजकीय हस्तक्षेप नसल्याचे सिद्ध झाल्याचा उल्लेख नितीश कुमार यांनी आवर्जुन केला.

सुशांत सिंह मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचा सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिला आहे. निर्णय सुनावताना, मुंबई पोलिसांना सर्व पुरावे सीबीआयकडे हस्तांतरित करण्यास न्यायालयाने सांगितले. तसेच सीबीआयला तपासात सहकार्य करण्यासही सांगितले आहे. पाटणा येथे रिया चक्रवर्तीविरोधात दाखल झालेला एफआयआर योग्य असल्याचे यावेळी सर्वोच्च न्यायालयाने म्हटले.

सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल; सुशांत मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचे आदेश
https://www.majhapaper.com/2020/08/19/landmark-supreme-court-decision-order-to-hand-over-sushants-death-case-to-cbi/