निवृतीच्या दिवशी धोनीच्या घरी आला महागडा पाहुणा


रांची : भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि ज्याचा कॅप्टन कुल असा उल्लेख होत आहे अशा महेंद्र सिंह धोनीने स्वातंत्र्य दिनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत आपल्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला. त्याच्या निवृत्तीमुळे अनेकांचा हिरमोड झाला. पण काहींनी त्याला आगामी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. त्यातच आता धोनीचे गाड्यांवर असलेले प्रेम हे सर्वश्रृत आहे. त्यामुळे त्यामुळे 15 ऑगस्टला ज्यादिवशी त्याने आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली, त्याच दिवशी त्याच्या गाड्यांच्या ताफ्यात महागड्या पाहुण्याचे आगमन झाले आहे.

View this post on Instagram

Major Mahi missing @mahi7781 !

A post shared by Sakshi Singh Dhoni (@sakshisingh_r) on

धोनीने 1970 च्या दशकातील पोंटिएक फायरबर्ड ट्रांस एम (Pontiac Firebird Trans Am) ही विंटेज लोकप्रिय कार खरेदी केली असून ही एक कार भारताच्या रस्त्यावर ही क्वचितच पाहण्यास मिळत असेल. धोनीने आपल्या गाड्यांसाठी रांची येथील फार्महाउसवर खास अशी जागा केली आहे. या कारचा फोटो तसेच व्हिडीओ धोनीची पत्नी साक्षीने इंन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

View this post on Instagram

Welcome home ! @mahi7781 missing you …#transam

A post shared by Sakshi Singh Dhoni (@sakshisingh_r) on

धोनीने खरेदी केलेल्या या कारचे स्टेअरिंग डाव्या बाजूला असून दोन दरवाजे असलेल्या या कारला V8 बिग ब्लॉक इंजिन देण्यात आले आहे. यात हर्स्ट शिफ्टरसह 4-स्पीड Muncie ट्रांसमिशन दिले आहे. पण ही कार खरेदी करण्यासाठी धोनीने किती पैसे मोजले, याबद्दल अद्याप खुलासा होऊ शकलेला नाही. पण अलीकडेच Pontiac Firebird Trans Am क्लासिक कारची मुंबईतील एका लिलावामध्ये विक्री झाली. तब्बल 68.31 लाख रुपयांना ही कार खरेदी करण्यात आली. मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात धोनीची अशीच कार लिलावामध्ये विक्रीसाठी ठेवण्यात आली होती. 1967 मध्ये पोंटिएकने पहिल्यांदा आपली फायरबर्ड सीरीजची सुरुवात केली होती. सध्या बाजारात असलेल्या अमेरिकेतील Ford Mustang (फोर्ड मस्टँग) आणि Mercury Cougar (मरकरी कॉगर) सारख्या गाड्यांसोबत ही कार टक्कर देते.

Jeep Grand Cherokee Trackhawk ही धोनीला प्रचंड आवडली होती. त्यामुळेच त्याने ही शानदार गाडी तब्बल 1.16 कोटींना खरेदी केली. या गाडीत 6.2-लिटर सुपरचार्ज्ड V8 HEMI इंजिन आहे. या इंजिनमधून तब्बल 707 bhp पॉवर आणि 875 Nm इतका टॉर्क जनरेट होतो. यात 8-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन दिले आहे. त्याचबरोबर या गाडीत 4-व्हील ड्राइव्ह सिस्टम देण्यात आली आहे. ही कार 3.62 सेंकदात 0-100 किलोमीटर प्रतितास एवढा वेग पकडते. या गाडीची केबिन ही Nappa लेदरने तयार करण्यात आली आहे.

62 लाख रुपये एवढी Jeep Grand Cherokee Trackhawk ची मुळ किंमत आहे. पण भारतात ही गाडी त्यावेळी लाँच झाली नव्हती. त्यामुळे ही गाडी भारतात विक्री होत नसल्यामुळे ही गाडी धोनीने देशाबाहेरुन मागवली. यासाठी त्याने जवळपास 1.16 कोटी रुपये मोजले होते. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतून एखादी वस्तू भारतात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात कर द्यावा लागतो, त्यामुळेच या गाडीची किंमतही 62 लाखांवरून 1.16 कोटींवर पोहोचली.