व्हिडीओ : बैरुतनंतर आता या ठिकाणी झाला भीषण स्फोट

लेबनानची राजधानी बैरुत येथे काही दिवसांपुर्वी भीषण स्फोट झाला होता. आता त्याचप्रमाणे चीनच्या शांडोंग प्रांतात मोठा स्फोटा झाल्याची घटना समोर आली आहे. चीनी मीडियानुसार हा धमाका पुर्व चीनच्या शोंडोंग प्रांतातील एका बाजाराजवळ झाला आहे. या स्फोटात किती लोक जखमी झाले आहेत, याबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही. स्फोटानंतर आकाशात धुराचा एक मोठा फुगाच तयार झाला होता. स्फोटामुळे अनेक घरांचे छत उडाले, काचा तुटल्या आहेत.

या घटनेत अद्याप कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू झाला नसल्याची माहिती आहे. घटनास्थळावर मदतकार्य सुरू आहे. जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेले आहे. सुरुवातीच्या तपासात हा स्फोट शेतकऱ्यांचे सामान ठेवले होते, त्या जागेवर झाला आहे. लाकूड कापताना वीजेच्या तारांचे नुकसान झाले व आग लागली. यानंतर मोठा स्फोट झाला.

याआधी लेबनानची राजधानी बैरुतमध्ये देखील मोठा स्फोट झाला होता. या स्फोटात आतापर्यंत 170 लोकांचा मृत्यू झाला असून, हजारो लोक बेघर झाले आहेत.