गुगलने आणले खास फीचर, युजर्सला सुचवणार लाईव्ह स्ट्रिमिंग चॅनेल

गुगलने आपल्या युजर्ससाठी सर्चमध्ये एक खास फीचर आणले आहे. आता युजर्स सर्चमध्ये लाईव्ह टिव्हीवर काय बघायचे आहे, याची निवड करू शकतात. युजर्स सर्चमध्ये लाईव्ह टिव्ही आणि यात स्ट्रिमचा पर्याय शोधू शकतात. ऑनलाईन ओटीटी प्लॅटफॉर्मवर हजारो चित्रपट आणि सीरिज उपलब्ध आहेत. यामुळे नक्की पाहायचे ? हा प्रश्न निर्माण झाला होता.

काही महिन्यांपुर्वी गुगलने ‘वॉट टू वॉच’ हा पर्याय सर्चमध्ये दिला होता. गुगलवर कोणताही चित्रपट सर्च केल्यानंतर या फीचरद्वारे नेटफ्लिक्स, अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओ सारख्या प्लॅटफॉर्म्सवरील काही चित्रपट आणि सीरिज सुचवत असे. मात्र आता या नवीन फीचरमुळे गुगल स्थानिक ब्रॉडकास्टर्स आणि केबल्सवरील लाईव्ह चॅनेल्स देखील युजरला सुचवणार आहे.

गुगलने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, युजर्स मोबाईल ‘वॉट टू वॉच’ किंवा ‘गुड शोज टू वॉच’ असे सर्च केल्यानंतर, गुगल आपल्या रिकमंडेशन लिस्टमध्ये स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म आणि लाईव्ह टिव्ही शोज दोन्हींची माहिती देईल.

गुगलने लाईव्ह स्पोर्ट्ससाठी देखील काही बदल केले आहेत. आता युजर आपल्या आवडीच्या स्पोर्ट्स टीमला फॉलो करू शकतील आणि सर्च केल्यानंतर लाईव्ह स्ट्रिमिंगचा पर्याय दिसेल. युजरने ‘वेअर टू वॉच सर्च’ केल्यानंतर गेमिंगच्या लाईव्ह स्ट्रिमिंगवर घेऊन जाईल.