लेबनानच्या मदतीसाठी पुढे आला भारत, पाठवले अन्नधान्य, वैद्यकीय मदत

लेबनानची राजधानी बैरुत येथे काही दिवसांपुर्वी हजारो टन अमोनियम नायट्रेटचा स्फोट झाला होता. या स्फोटात संपुर्ण शहर बेचिराख झाला होता. शेकडो लोकांचा मृत्यू, तर हजारो लोक जखमी झाले होते. आता या घटनेनंतर अनेक देश बैरुतच्या मदतीसाठी पुढे येत आहेत. भारत देखील या संकटाच्या काळात बैरुतच्या मदतीसाठी धावला आहे.

भारताने लेबनानला अन्नधान्य आणि वैद्यकीय सेवेसह 58 मॅट्रिक टन आपतकालीन मदत पाठवली आहे. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी ट्विट करत माहिती दिली की, बैरुतमध्ये झालेल्या भीषण स्फोटानंतर भारत लेबनॉनच्या जनतेसोबत आहे. आवश्यक वैद्यकीय आणि अन्नधान्यासह 58 मॅट्रिक टन आपतकालीन सहाय्यता भारतीय हवाई दलाच्या सी17 विमानाने बैरुतला पाठवण्यात आले आहे.

परराष्ट्र मंत्रालयाने मागील आठवड्यात म्हटले होते की, भारताने लेबनान सरकारकडे स्फोटामुळे झालेल्या नुकसानाची माहिती मागितली आहे. ज्याच्या आधारावर मदत करण्याविषयी निर्णय घेतला जाईल.

दरम्यान, 4 ऑगस्टला झालेल्या या भीषण स्फोटात 170 लोकांचा मृत्यू झाला असून, हजारो लोक बेघर झाले आहेत.