पार्थ ‘इमॅच्युअर’, त्याच्या मागणीला कवडीची किंमत नाही – शरद पवार


मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते अजित पवार यांचे पूत्र पार्थ पवार यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी निशाणा साधला आहे. आपण पार्थच्या मागणीला कवडीची किंमत देत नाही, तो अजून इमॅच्युअर असल्याचे शरद पवार म्हणाले आहेत. पार्थ पवार यांनी काहीच दिवसांपूर्वी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची सुशांतसिंग राजपूत प्रकरणी भेट घेतली होती. त्यांनी या भेटीमध्ये सुशांतसिंग मृत्यू प्रकरणाची चौकशी सीबीआयला द्यावी, अशी मागणी केली होती.

दरम्यान आज शरद पवार आणि संजय राऊत यांची भेट झाली. दोन्ही नेत्यांमध्ये सुशांतसिंग राजपूत प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे गेली, तर पुढे काय करायचे? याबाबत चर्चा झाल्याचे वृत्त आहे. पण अशी कोणतीच चर्चा झाली नसल्याचे शरद पवार यांनी सांगितले आहे. संजय राऊत आणि मी नेहमीच भेटत असल्याचे पवार यावेळी म्हणाले.