जाणून घ्या कसे बनवाल गुगल सर्चमध्ये तुमचे पीपल कार्ड?


भारतात पीपल कार्ड हे नवे फिचर गुगलने लॉन्च केल्यामुळे गुगल सर्चवर युजर्संना पब्लिक प्रोफाईल बनवता येणार आहे. भारतात गेल्या काही वर्षांपासून या नव्या फिचरचे टेस्टिंग सुरु होते. हे फिचर आता लॉन्च करण्यात आले असून यामुळे लोकांना ऑनलाईन सर्च करणे अधिक सोपे होणार आहे. पीपल कार्ड या नव्या फिचरमुळे डिजिटल व्हिजिटिंग कार्ड युजर्संना मिळणार आहे. युजर्स याद्वारे आपले सोशल मीडिया प्रोफाईल, लोकेशन, वेबसाईट, फोन नंबर आणि ईमेल आयडी लोकांसोबत शेअर करु शकतील.

पीपल कार्ड लॉन्च करण्यामागील गुगल सर्चवर प्रत्येक युजरला आपली पब्लिक प्रोफाईल तयार करता यावी हा उद्देश आहे. गुगलवर सर्च केल्यानंतर हे पीपल कार्ड टॉप रिझल्टवर दिसेल. तसेच युजर्संना आवश्यक आणि विश्वसनीय माहिती मिळावी हा देखील पीपल कार्ड लॉन्च करण्यामागील हेतू आहे. काही चुकीचा कन्टेट पीपल कार्डमध्ये आढळल्यास युजर्स त्या कार्डबद्दल रिपोर्ट करु शकतात. प्रत्येक व्यक्ती केवळ एकच पीपल कार्ड तयार करु शकते. हा महत्त्वपूर्ण फेक प्रोफाईल्संना आळा घालण्यासाठी निर्णय घेण्यात आला आहे.

पीपल कार्ड तयार करण्यासाठी सर्वप्रथम गुगल अकाऊंटवर साईन इन करा आणि ‘add me to search’ असे सर्च करा. त्यानंतर ‘Add yourself to Google Search’ असा मेसेज तुमच्या स्क्रिनवर दिसेल. त्या पॉपअप मेसेजवर क्लिक करा. तुमचा मोबाईल नंबर विचारला जाईल. मोबाईल नंबर सहा अंकी युनिक कोडने व्हेरिफाय करण्यात येईल. पब्लिक प्रोफाईल तयार करण्यासाठी गुगल कडून तुम्हाला एक फॉर्म देण्यात येईल. त्यात तुम्हाला विचारलेली माहिती भरायची आहे. उदा. लोकेशन, व्यवसाय, शिक्षण, वेबसाईट, सोशल मीडिया प्रोफाईल, इत्यादी. हे सर्व झाल्यानंतर सेव्ह बटणावर क्लिक करा. काही तासांनंतर तुमचे पीपल कार्ड तयार होईल. या नव्या फिचरमुळे पब्लिक प्रोफाईल तयार करणे सोपे होणार असून हे भारतीय युजर्सच्या नक्कीच पसंतीस पडेल, विश्वास गुगलने व्यक्त केला आहे.