भाजपच्या बड्या नेत्याने शरद पवारांची भेट घेतल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण


मुंबई – राज्यावर ओढावलेल्या कोरोनामुळे चिंताजनक परिस्थिती असतानाच या मुद्यांसह दुसऱ्या अनेक मुद्यांवरुन राज्यातील राजकीय वातावरण तापलेले आहे. त्यातच काल राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी भाजपमध्ये निवडणुकी आधी गेलेले राष्ट्रवादीचे नेते लवकरच घरवापसी करतील असे वक्तव्य करून खळबळ उडवून दिली होती. अशा परिस्थितीतच भाजपचा राज्यातील एक बडा नेता आज शरद पवार यांच्या भेटीला गेल्याने पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

आज राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांची भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी भेट घेतली. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विटरवर शेलारांसोबतचा फोटो शेअर करून या भेटीची माहिती दिली. पण या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. पण आज अचानक आशिष शेलार यांनी शरद पवार यांची भेट का घेतली. त्याचबरोबर शेलार आणि शरद पवार यांच्या भेटीत नेमक्या कोणत्या विषयावर चर्चा झाली याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही.