भारतीय रेल्वेचा खुलासा; नोकर भरतीसंदर्भात देण्यात आलेली ‘ती’ जाहिरात खोटी


नवी दिल्ली – केवळ रेल्वे मंत्रालयाला भारतीय रेल्वेमधील नोकर भरतीसंदर्भातील अधिकार असून त्यासंदर्भात कोणतीही खाजगी संस्था नोकर भरतीची जाहिरात देऊ शकत नसल्याचे सांगत वर्तमानपत्रात अवेस्ट्रान इन्फोटेककडून (Avestran Infotech) दिलेल्या जाहिरातीवर खुलासा केला आहे. भारतीय रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, अवेस्ट्रान इन्फोटेकच्या जाहिरातीप्रमाणे कोणत्या प्रकारची नोकर भरती करण्यात येणार नाही आहे. तसेच जाहिरातीमध्ये लिंगानुसार भेदभाव आहे. तसा भेदभाव भारतीय रेल्वे करत नसल्याचा दावा केला आहे. त्यामुळे अवेस्ट्रान इन्फोटेकच्या जाहिरातीमधील दावा खोटा असल्याचे सांगितले आहे.

दरम्यान 5 हजार 285 जागांसाठी 8 विविध कॅटेगरीमध्ये नोकरभरती होणार असून हे 11 वर्षांचं कॉन्ट्रॅक्ट असेल असे अवेस्ट्रान इन्फोटेकच्या जाहिरातीमध्ये सांगण्यात आले होते. 750 रूपये फी डिपॉझिट इच्छुक उमेदवारांना आहे तसेच 10 सप्टेंबर पर्यंत अर्ज करू शकता असे सांगण्यात आले होते. www.avestran.in वर अर्ज करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.

Railway Recruitment Boards आणि 16 अन्य Railway Recruitment Cell भारतीय रेल्वेमधील सी आणि डी ग्रुपमधील कर्मचार्‍यांची भरती करण्यासाठी आहेत. नोकरभरती त्यांच्या माध्यमातूनच केली जाते. तसेच रेल्वेतील नोकर भरती ही Employment News आणि रोजगार समाचारमधून देखील प्रसिद्ध होते. तसेच ऑनलाईन नोकरभरतीबद्दल RRBs आणि RRCs च्या माध्यमातून नोटिफिकेशन जारी करण्यात येते.

दरम्यान खाजगी कंपन्यांना भारतीय रेल्वे कोणतीही नोकरभरती करण्यासाठी कंत्राट देत नसल्याने अवेस्ट्रान इन्फोटेकच्या जाहिरातीबद्दल तपास करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. दोषींवर देखील नियमांनुसार कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.