बिग बॉसच्या १४ व्या पर्वाचा प्रोमो रिलीज


बिग बॉसचा १४ वे पर्व गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. बॉलिवूडचा भाईजान सलमान खान यंदाचे सीझन होस्ट करणार नसल्याचे म्हटले जात असल्यामुळे या चर्चा सुरु झाल्या होत्या. पण आता या सर्व अफवा असल्याचे समोर आले आहे. बिग बॉस १४चा प्रोमो नुकताच रिलीज करण्यात आला आहे. हा प्रोमो पाहता यंदाच्या सीझनमध्ये बदल करण्यात आल्याचे दिसत आहे.

बिग बॉस १४चा प्रोमो कलर्सने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. सलमान खान या व्हिडीओमध्ये शेती करताना दिसत असल्यामुळे बिग बॉस १४मध्ये नवे ट्विस्ट येणार असल्याचे म्हटले जात आहे. तसेच ‘बिग बॉस 2020’ हे टायटल यंदा बिग बॉसच्या १४व्या पर्वला देण्यात आले आहे.

सध्या बिग बॉसचा हा प्रोमो चर्चेत आहे. या प्रोमो व्हिडीओमध्ये लॉकडाउनमुळे नॉर्मल लाइफमध्ये स्पीड ब्रेकर आल्यामुळे मी शेती करत आहे. पण आता सीन पलटणार, असे बोलताना सलमान दिसत आहे. शोच्या टायटल संदर्भात अनेक चर्चा होत आहेत. बिग बॉसचे नवे सीझन बिग बॉस १४च्या ऐवजी बिग बॉस २०२० म्हणून ओळखले जाणार आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये शोबाबत उत्सुकता वाढली आहे.