आता मेड इन इंडिया अ‍ॅपल मॅक आणि आयपॅड्स; मिळणार 55 हजार स्थानिकांना रोजगार


नवी दिल्ली – कोरोनाच्या उगमाला कारणीभूत ठरलेल्या चीनवर सध्या जगभरातील सर्वच देश टीका करत आहेत. कारण चीनमुळे संपूर्ण जग कोरोनामय झाला आहे. त्याचमुळे चीनमध्ये व्यवसाय करताना तंत्रज्ञानातील जागतिक प्रतिस्पर्धीही अधिक सावध झाले आहेत. त्यापैकी बऱ्याच ब-याच देशांनी आपले बस्तान गुंडाळून आपल्या देशात वापसी करण्याचा विचार सुरु केला आहे. तर थायलंड, व्हिएतनाम आणि भारत यांसारख्या बाजारपेठांकडे इतर उत्पादनांसाठी आणि निर्यातीसाठी जगभरातील अन्य देश पाहत आहेत.

भारतात आपले उत्पादन कसे वाढविता येईल, यासाठी अॅपलही प्रयत्नशील आहे. आयफोन एक्सआर बरोबर आता आयफोन 11 तयार करण्यास अॅपलने सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे अॅपलही करार असलेल्या कंत्राटदार उत्पादक कंपन्याही चीनहून भारतात येण्याबाबत गंभीर विचार करीत आहेत.

यासंदर्भात टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार चीनमधील बाजारपेठेतून एकाच वेळी 5 अब्ज डॉलर्स किमतीच्या आयफोन्सची निर्यात करण्याचे लक्ष्य ठेवून अॅपलची एक मोठी कंत्राटदार उत्पादक कंपनी असल्यामुळेच चीनमधून सहा उत्पादन लाइन भारतात हलविण्याच्या विचारात आहे.

सुमारे 55,000 भारतीय कामगारांना ही सुविधा प्रत्यक्षात उतरल्यानंतर वर्षभरातच रोजगार मिळू शकणार आहे. त्याचबरोबर विक्रेते फक्त स्मार्टफोन बनवण्याचा विचार करीत नाहीत, तर येत्या काही वर्षांत लॅपटॉप, टॅब्लेट आणि इतर संगणकांच्या उत्पादनाकडेही वळणार आहेत. याचा अर्थ असा होऊ शकतो की, भारतात आयपॅड्स, मॅकबुक आणि आयमॅक तयार झाल्यास ते भारतीयांना स्वस्त किमतीत उपलब्ध होऊ शकतील. विशेष म्हणजे अॅपलला भारतातून वस्तू आयात करण्यासाठी मोठा करही द्यावा लागणार नाही.

यापूर्वीच भारतात अॅपलच्या मुख्य उत्पादकाकडून वस्तूंचे कंटेनर दाखल झाले असून, ते लवकरच याचे उत्पादन भारतात सुरू करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. Wistron, Pegatron, Foxconn and Samsung या निर्मात्यांनीही भारताच्या मेक इन इंडिया योजनेला प्रोत्साहन देण्यासाठी त्यात सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. येत्या पाच वर्षांत सुमारे 22 देशांतर्गत अन् जागतिक उत्पादक सुमारे 11.5 लाख कोटी रुपयांची उत्पादने तयार करतील आणि सुमारे 7 लाख कोटी रुपयांची निर्यात होईल, अशी माहिती केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी निवेदनात दिली आहे.