आरबीआयचा मोठा निर्णय, आता स्टार्ट अप्सला सहज मिळणार कर्ज

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने स्टार्टअप्ससाठी मोठा निर्णय घेतला आहे. स्टार्ट अप्सला कोणत्याही प्रकारच्या फंडिगची समस्या जाणवू नये यासाठी आरबीआयने स्टार्ट अपला आता प्रॉयरिटी सेक्टर लेंडिंगमध्ये (कर्जासाठी प्राथमिकता) समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. सोबतच रिन्यूएबल एनर्जी सेक्टरला कर्जाचा मर्यादा देखील वाढवली आहे.

प्रॉयरिटी सेक्टर लेंडिंग अंतर्गत आरबीआयने स्मॉल अँड मार्जिनल फॉर्मर्स आणि वीकर सेक्शनला देण्यात येणारे कर्ज वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. आता यांना बँकेकडून सहज कर्ज उपलब्ध होईल.

आरबीआयने आपल्या गाईडलाईनमध्ये बदल केले आहे. या संदर्भात त्यांनी स्टेकहोल्डर्सचे देखील मत जाणून घेतले. नवीन गाईडलाईनमध्ये फ्रेंडली लेंडिंग पॉलिसीवर लक्ष केंद्रीत करण्यात आलेले आहे. याचा उद्देश शाश्वत विकासाची उद्दिष्टे साध्य करणे आहे. याअंतर्गत आता स्टार्टअप्स या कार्यक्षेत्रात आणले आहे. सोबतच रिन्यूएबल एनर्जी, ज्यात सोलर पॉवर आणि कंप्रेस्ट बायो गॅस प्लांटचा देखील समावेश आहे, त्याच्या कर्जाची मर्यादा वाढवली आहे. छोट्या शेतकऱ्यांना देखील कर्ज देण्याचे निर्देश दिले आहेत.