लेबनानची राजधानी बैरुत येथे काल सायंकाळी एक मोठा धमका झाल्याची घटना समोर आली असून, हा धमका एखाद्या छोठ्याशा अणुबॉम्ब सारखाच होता. या धमाक्यामुळे शहरातील अर्धा भाग उद्धवस्त झाला आहे. जवळपास 10 किमीचा भाग पुर्णपणे उद्धवस्त झाला आहे. इमारती जमिनदोस्त झाल्या आहेत. या घटनेचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
व्हिडीओ : अणुबॉम्ब सारख्या धमाक्यामुळे उद्ध्वस्त झाले बैरुत, हे आहे स्फोटाचे खरे कारण
बैरुत बंदराजवळील इमारती, घर आणि शॉपिंग कॉम्प्लेक्स सर्व काही उद्धवस्त झाले आहेत. जखमी उपचार करण्यासाठी हॉस्पिटल देखील नाहीत, कारण ते देखील उद्धवस्त झाले आहे. जवळील हॉस्पिटलमध्ये एकाचवेळी एवढे जखमी पोहचले आहेत की आता जागा कमी पडत आहे.

हा धमका एवढा भीषण होता की, बैरुतच्या चारही बाजूला 4.5 तीव्रतेचा भुकंप जाणवला. हा धमका अमोनियम नायट्रेटच्या स्फोटामुळे झाल्याचे सांगितले जात आहे. या ठिकाणी 2750 टन अमोनियम नायट्रेटचा साठा करण्यात आला होता. यात स्फोट झाल्याने संपुर्ण शहर उद्धवस्त झाले. या भीषण स्फोटाचा तडाखा एवढा जबरदस्त होता की एखादा छोटा अणुबॉम्ब फुटल्यासारखे वाटत होते.
सुरुवातीला फटाक्यांच्या गोदामात स्फोट झाल्याचे, त्यानंतर दहशतवादी हल्ला झाल्याचे देखील सांगितले जात होते. मात्र नंतर 2750 टन अमोनियन नायट्रेटचा स्फोट झाल्याने हा धमाका झाला असल्याचे स्पष्ट झाले. यात जवळपास 70 लोकांचा मृत्यू झाला असून, शेकडो लोक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.