जम्मू काश्मीरमधील मुस्लिम नेता अमित शहा कोरोनामुक्त होत नाही तोपर्यंत ठेवणार रोजा


नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना कोरोनाची लागण झाली असून सध्या त्यांच्यावर गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आपल्याला कोरोना झाल्याची माहिती अमित शहा यांनी स्वतः ट्विट करून दिली होती. आपल्यात कोरोनाची काही प्राथमिक लक्षणे दिसल्यानंतर त्यांनी कोरोना टेस्ट केली होती, त्या टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान आपल्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना देखील कोरोनाची चाचणी करण्याचे आवाहन अमित शहा यांनी केले आहे.

अमित शहा यांना कोरोनाची बाधा झाल्यानंतर त्यांच्या स्वास्थ्यासाठी देशभरातून प्रार्थना केल्या जात आहेत. पण अमित शहा यांच्या स्वास्थ्यासाठी जम्मू- काश्मीरमधील भाजपचे नेते गुफ्तार अहमद यांनी देखील रोजा ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. जोपर्यंत अमित शहा कोरोनामुक्त होत नाही तोपर्यंत आपण रोजा ठेवणार असल्याचे गुफ्तार अहमद यांनी म्हटले आहे. अमित शहा यांना बरे वाटावे म्हणून आपण अल्लाहकडे प्रार्थना करत असल्याचे गुफ्तार अहमद यांनी ट्विटरवर व्हिडिओद्वारे सांगितले.