शरद पवारांच्या हस्ते लालबागचा राजा आरोग्योत्सवाचे उद्घाटन


मुंबई – राज्यावर ओढावलेल्या कोरोनाच्या संकटामुळे देशासह जगभरात ख्याती प्राप्त अशा प्रसिद्ध लालबाग राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यावर्षी गणेशोत्सवा ऐवजी आरोग्योत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला. या पार्श्वभूमीवर आजपासून प्लाझ्मादान शिबिराची सुरुवात होणार असून ज्याचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. 86 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच लालबाग राजा विराजमान होणार होणार नाही

*लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ*लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यावर्षी कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग…

Posted by Lalbaugcha Raja Sarvajanik Ganeshotsav Mandal on Sunday, August 2, 2020

याबाबत माहिती देताना मंडळाच्या वतीने फेसबुकवर एक पोस्ट केली आहे, त्या पोस्टमध्ये मंडळाने लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यावर्षी कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन लोकहितनिर्णय घेतला आहे. जगभरातील गणेशभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या, लालबागच्या राजाच्या दर्शनाला भाविकांची होणारी अलोट गर्दी लक्षात घेता आणि सुरक्षाकारणास्तव कोरोनाचा संसर्ग टाळण्याच्या हेतूने लालबागच्या राजाची मूर्तीची प्रतिष्ठापना न करता फक्त ‘आरोग्योत्सव’ साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. जीवदान देणा-या या ‘आरोग्योत्सव’ आणि ‘प्लाझ्मादान’ शिबिराचे ऊद्घाटन सोहळा जेष्ठ नेते सन्माननीय खासदार शरदचंद्रजी पवार यांच्या शुभहस्ते सोमवार दि. ३ ऑगस्ट २०२० रोजी सायंकाळी ठीक ५.०० वाजता लालबागचा राजा मार्ग, लालबाग मार्केट, मुंबई – ४०० ०१२ या ठिकाणी संपन्न होणार असल्याचे म्हटले आहे.

त्याचबरोबर मंडळाने केईएम रुग्णालयाच्या संयुक्ताने प्लाझ्मादान मोहीम हाती घेतली आहे. यासाठी 3 ऑगस्ट ते 31 ऑगस्टपर्यंत नोंदणी करता येणार आहे. तसेच गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांसोबत झालेल्या हिंसक झडपेत शहीद झालेल्या भारतीय सैनिकांच्या कुटुंबियांचा सन्मान केला जाणार. तसेच कोरोनाशी लढताना हुतात्मा झालेल्या पोलिसांच्या कुटुंबीयांना 1 लाख, शौर्यचिन्ह देण्यात येणार असल्याचे मंडळाकडून सांगण्यात आले.