DCGIची सीरम इंस्टिट्युटच्या कोव्हीशिल्ड लसीच्या क्लिनिकल ट्रायलला मंजुरी


पुणे – ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (डीसीजीआय) पुण्यातील सीरम इंस्टिट्युट ऑफ इंडियाच्या कोरोना प्रतिबंधक लस कोव्हीशिल्डच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या क्विनिकल ट्रायलला मंजुरी दिली आहे. जगावर ओढावलेल्या कोरोना संकटावर मात करण्यासाठी विविध देशांमध्ये लस तयार करण्याचे काम प्रगती पथावर आहे. ऑक्सफोर्ड विद्यापीठातील शास्त्रज्ञांच्या मदतीने पुण्यातील सीरम इंस्टिट्युट भारतात हे काम करत आहे. सीरम इंस्टिट्युटचे सीईओ अदार पूनावाला ही लस मोठ्या प्रमाणात तयार करण्यात येणार असून प्रति मिनिट 500 व्हॅक्सिन डोस तयार केले जातील अशी माहिती दिली आहे.

ऑक्सफर्डच्या शास्त्रज्ञांसोबत मिळून सीरम इंस्टिट्यूट कंपनी कोरोना प्रतिबंधक लस तयार करणार आहे. एक्स्ट्राजेनेका आणि ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या वतीने ही लस तयार केली जात आहे. सध्या ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या लसीने तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला सुरुवात केली. तर रशियातील आपल्या प्रायोगिक कोरोना लसीच्या 3 कोटी डोसची तयारी करत आहे. या लसीचे 17 कोटी डोस परदेशात बनविण्याचा रशियाचा मानस आहे.

तत्पूर्वी मॉडर्ना या अमेरिकन कंपनीची कोरोना व्हायरस लसदेखील पहिल्या चाचणीत पूर्णपणे यशस्वी झाली. न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासानुसार 45 निरोगी लोकांवर या लसीची पहिली चाचणी घेतली असता चांगले निकाल हाती आले आहेत. पहिल्या चाचणीत 45 लोकांचा समावेश होता ते निरोगी असून त्यांचे वय 18 ते 55 असे आहे.