सुशांत सिंहने लफडेबाज जीवनामुळे केली असेल आत्महत्या – संभाजी भिडे


सांगली – आज सांगलीत शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी त्यांनी राम मंदिर भूमिपूजन, कोरोना आणि सुशांत सिंह राजपूत प्रकरणावर भाष्य केले. सुशांत सिंहच्या आत्महत्येवर बोलताना ते म्हणाले, सुशांत सिंह हा बेकार माणूस आहे, जर खोलात गेले तर काही तर लफडेबाज जीवन असेल आणि त्यामुळेच त्याने आत्महत्या केली असेल.

आज समाजाने आदर्श मानलेल्या चित्रपटातील नट-नट्याची पात्रता काय? लायकी काय? त्यांची उंची काय? या नट नट्यांना आपल्या देशातील समाज मार्गदर्शक आणि दिशादर्शक म्हणून स्वीकारतो म्हणजे या देशाचे लवकरात लवकर वाटोळे होणार आहे, असे देखील यावेळी संभाजी भिडे म्हणाले. त्याचबरोबर सुशांत सिंह बद्दल बोलून आयुष्य वाया घालवणे चूकीच आहे, हे आपण करायला नको. सुशांत सिंह हा बेकार माणूस आहे, जर खोलात गेले तर काही तर लफडेबाज जीवन असेल आणि त्यामुळे त्याने आत्महत्या केली असेल.

दुर्दैव हे आहे की उगवता तरुण वर्ग हा नट आणि नट्यांच्या थिल्लर अत्यंत उथळ, टाकाऊ मार्गाचे आकर्षण घेऊन जगत आहे, हे या देशाचे दुर्दैव आहे. आज देशाला भगवान श्री कृष्ण, प्रभू रामचंद्र, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आदर्शाची गरज आहे. पण सुशांत हा त्या लायकीचा पण माणूस नसल्याची भूमिका संभाजी भिडे यांनी मांडली.