प्रत्येक मुलीच्या या 5 प्रकारच्या असतात मैत्रिणी


ऑगस्ट महिन्याचा पहिला रविवार हा फ्रेंडशिप डे म्हणून साजरा केला जातो. यादिवशी तरुणाईच्या आनंदाला उधाण आलेले असते. आपल्या मित्र मैत्रिणी प्रति असलेल्या भावना मेसेज किंवा फोनच्या माध्यमातून आपण व्यक्त करतो. त्यातच आपले काही मित्र आणि मैत्रिणी देखील असतात. तसेच मुलींची फ्रेंडलिस्ट फार मोठी असते. एक खास मैत्रीण त्यांच्याकडे प्रत्येक कार्यक्रमासाठी असते. मुलींच्या फ्रेंडलिस्टमध्ये शॉपिंगला जाण्यापासून ते फिरायला जाण्यापर्यंत अशा पाच मैत्रीणी नेहमीच दिसतील ज्यांच्याशिवाय त्या राहूच शकणार नाहीत.

दोन मुली कधीच जवळच्या मैत्रिणी होऊ शकत नाही, असे नेहमीच बोलले जाते. पण जर एखादे सीक्रेट शेअर करायचे असेल तर कोणतीही मुलगी मुलीचाच खांदा शोधते. प्रत्येक मुलीकडे अशी मैत्रीण असते, ती जिच्याजवळ मनातील दुःख मनमोकळेपणाने बोलू शकते.

मुली आणि फॅशन या एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात. एक अशी मैत्रीण त्यांच्यासोबत असते जिच्याकडे शॉपिंगशी निगडीत सर्व माहिती असते. त्यामुळे तिलाच शॉपिंगला जाताना घेऊन जाणे पसंत केले जाते.

आपले आयुष्य हलके फुलके राहण्यासाठी आपल्याला मनमुरादपणे हसणेही आवश्यक असते. अशी एखादी मैत्रीण मुलींच्या फ्रेंडलिस्टमध्ये नक्की असते, जी वातावरण हलके फुलके ठेवते. त्या मुलीसोबतची मैत्री दीर्घकाळ टिकते. तिची कंपनी प्रत्येकालाच हवीहवीशी वाटते.

एक मुलगी ग्रुपमध्ये नक्कीच अशी असते जिला सर्व गोष्टींबद्दल माहिती असते. ऑफिसमध्ये किंवा कॉलेजमध्ये कोणाशी कोणाचे भांडण झाले. कुठे कोणाचे कोणाशी अफेअर सुरू आहे. अशा सर्व गोष्टी तिला माहिती असतात.

Leave a Comment