भारतीय रिझर्व्ह बँकेत नोकरीची संधी; असा कराल अर्ज


नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेकडून अनेक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात येणार असून त्यासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. डेटा एनालिस्ट, अकाऊंट स्पेशालिस्टसह इतर अन्य पदांच्या भरतीसाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने नोटिफिकेशन जारी केले आहे. 3 ऑगस्टपासून या पदांसाठी ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे. डेटा एनालिस्ट, अकाऊंट स्पेशालिस्टसह एकूण 39 पदांसाठी RBI Recruitment 2020 अंतर्गत, भरती करण्यात येणार आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेत नोकरीसाठी अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता पदांनुसार वेगवेगळी आहे. सीए, बीटेक, बीई आणि एमटेकचे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करु शकतात. शैक्षणिक पात्रतेबाबत अधिक माहितीसाठी उमेदवार ऑफिशियल नोटिफिकेशन चेक करु शकतात.

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या विविध पदांवर, या रिक्त पदाची वयोमर्यादादेखील वेग-वेगळी ठरवण्यात आली आहे. ज्यात पदांनुसार, कमीत-कमी 25 वर्ष ते अधिकाधिक 40 वर्षांपर्यंत वयोमर्यादा ठरवण्यात आली आहे. 3 ऑगस्ट 2020 पासून ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु होणार आहे. तर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 ऑगस्ट 2020 संध्याकाळी 6 वाजेपर्यंत असणार आहे. इच्छुक उमेदवार भारतीय रिझर्व्ह बँकेच्या अधिकृत संकेतस्थळ rbi.org.in वर ऑनलाईन अर्ज पाठवू शकतात. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या या पदांसाठी उमेदवाराची निवड मुलाखत आणि शॉर्टलिस्टच्या आधारे होणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या संकेतस्थळावरुन उमेदवार अधिक माहिती घेऊ शकतात.