… म्हणून मंत्र्याने स्वतः केली लेडीज टॉयलेटची सफाई

मध्य प्रदेश सरकारमधील एका मंत्र्याचे आपल्या कामगिरीसाठी सध्या विशेष कौतुक केले जात आहे. याला कारणही तसेच खास आहे. कारण या मंत्र्याने स्वतः टॉयलेटची सफाई केली आहे. मध्य प्रदेशच्या ग्वालेहर येथील सरकारी कार्यालयात पोहचलेले राज्याचे उर्जा प्रद्युमन सिंह तोमर तेथील घाण बघून एवढे भडकले की त्यांनी स्वतःच टॉयलेटची सफाई करण्याचा निर्णय घेतला.

प्रद्युमन सिंह तोमर हे ग्वालेहर येथील डिव्हिजनचे आयुक्त यांच्याशी चर्चा करण्यासाठी गेले होते. यावेळी तेथील कार्यालायतील काही महिलांनी त्यांच्याकडे तक्रार केली की त्यांच्यासाठी बनविण्यात आलेल्या टॉयलेटची नियमित साफ-सफाई केली जात नाही. टॉयलेट अस्वच्छ असल्याने त्यांना समस्येचा सामना करावा लागतो.

महिलांच्या तक्रारीनंतर तोमर यांनी स्वतः त्या परिसरातील टॉयलेटची पाहणी केली. टॉयटेल घाण आढळल्यानंतर त्यांनी स्वतः साफ-सफाई करण्यास सुरुवात केली.

तोमर कर्मचाऱ्यांना म्हणाले की, शासकीय कार्यालय परिसरातील साफ-सफाईची जबाबदारी समजून घ्या व स्वच्छता ठेवा. याशिवाय साफ-सफाईसाठी जबाबदार असणाऱ्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.