हार्दिकने शेअर केला ‘ज्यूनिअर पांड्या’चा गोंडस फोटो

भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि पत्नी नताशा स्टॅनकोविहकने काही दिवसांपुर्वीच बाळाच्या जन्माची माहिती आपल्या फॅन्सला दिली होती. सोशल मीडियावर बाळाचा हात हातात घेतल्याचा एक फोटो शेअर पांड्याने ही गोड बातमी दिली होती. आता हार्दिकने बाळाला उचलून घेतल्याचा सुंदर फोटो शेअर केला आहे.

View this post on Instagram

The blessing from God 🙏🏾❤️ @natasastankovic__

A post shared by Hardik Pandya (@hardikpandya93) on

पांड्याने हा गोंडस फोटो शेअर करत लिहिले, देवाकडून मिळालेला आशिर्वाद. आपल्या मुलाचा पांड्याने शेअर केलेला हा पहिलाच फोटो आहे. हा फोटो व्हायरल होत असून, नेटकरी देखील यावर प्रतिक्रिया देत आहेत.

हार्दिकने 1 जानेवारी 2020 ला नताशासोबत साखरपुडा करत आपल्या फॅन्सला सुखःद धक्का दिला होता. त्यानंतर लॉकडाऊनमध्ये नताशासोबत फोटो शेअर करत ती गर्भवती असल्याची माहिती दिली होती. दोघांनी सोशल मीडियावर मॅटर्निटी शूटचे अनेक फोटो शेअर केले होते.

हार्दिक आयपीएलमध्ये ज्या संघाकडून खेळतो, त्या मुंबई इंडियन्सने देखील त्यांचा सुंदर फोटो शेअर केला आहे.