पाण्यामुळे नष्ट होतो कोरोना व्हायरस, रशियाच्या वैज्ञानिकांचा दावा

कोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी साफसफाई, वारंवार हात धुण्यास सांगितले जात आहे. व्हायरसच्या पसरण्यापासून ते त्याच्या स्वरुपापर्यंत वेगवेगळे दावे केले जात आहेत. आता रशियाच्या वैज्ञानिकांनी दावा केला आहे की, कोरोना व्हायरस पाण्यात पुर्णपणे नष्ट होतो. हा अभ्यास स्टेट रिसर्च सेंटर ऑफ वायरोलॉजी अँड बायोटेक्नोलॉजी वेक्टरद्वारे करण्यात आलेला आहे.

अभ्यासात वैज्ञानिकांनी दावा केला आहे की पाण्यात कोरोना व्हायरस जवळपास 72 तासांचमध्ये संपुर्णपणे नष्ट होतो. व्हायरसचे रुप थेट पाण्याच्या तापमानावर निर्भर आहे. वैज्ञानिकांचा दावा आहे की 90 टक्के व्हायरसचे कण 24 तासात आणि 99.9 टक्के कण खोलीतील सामान्य तापमानात ठेवलेल्या पाण्यात मरतात. उकळत्या पाण्याच्या तापमानात कोरोना व्हायरस त्वरित मरतो. मात्र काही परिस्थितीमध्ये जिंवत देखील राहू शकतो. मात्र समुद्र अथवा वाहत्या पाण्यात वाढत नाही.

संशोधनात आढळले की, व्हायरस एका जागे थांबत नाही व अधिकांश घरगुती किटकनाशके याला नष्ट करण्यास प्रभावी ठरले आहे. संशोधनात आढळले आहे की, 30 टक्के कॉन्स्ट्रेशनचे एथिल आणि आयसोप्रोपाइल अल्कोहल अर्ध्या मिनिटात व्हायरसचे एक लाख कण नष्ट करतात.

दरम्यान, रशियाने कोरोना प्रतिबंधक लसीची निर्मिती केल्याचा दावा केला असून, लस 15 ऑगस्टपर्यंत उपलब्ध केली जाणार आहे.

(टिप : वरील बाबी संशोधन अथवा अभ्यासतून सिद्ध झालेल्या असून त्या केवळ माहिती म्हणून आम्ही आमच्या वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. त्याचा दावा माझा पेपर यातून करत नाही.)