तंबाखूपासून बनवली कोरोना प्रतिबंधक लस?, लवकरच होणार मानवी ट्रायल

एप्रिलमध्ये ब्रिटिश अमेरिकन कंपनी टोबॅकोची सब्सडियरी कंपनी बायोप्रोसेसिंगने दावा केला होता की ते एक प्रायोगिक कोव्हिड-19 लस बनवत आहे व ही लस तंबाखूपासून बनविली जात आहे. आता कंपनी याचे मानवी ट्रायल करणार आहे.

लंडन येथे स्थित लकी स्ट्राईक सिगरेट बनविणाऱ्या या कंपनीने दावा केला आहे की, तंबाखूच्या पानांपासून काढण्यात आलेल्या प्रोटीनद्वारे लस तयार केली आहे.

लकी स्ट्राईक सिगरेटचे प्रमुख मार्केटिंग अधिकारी किंग्सले व्हिटन म्हणाले की, कंपनीने मानवी ट्रायलसाठी अमेरिकेच्या फूड अँड ड्रग अ‍ॅडमिनिस्ट्रेशनकडे परवानगीसाठी अर्ज केला आहे. व्हिटन म्हणाले, आम्हाला पुर्ण विश्वास आहे की मानवी ट्रायलसाठी परवानगी मिळेल. आमच्या लसीने प्री-क्लिनिकल ट्रायलमध्ये कोव्हिड-19 च्या विरोधात चांगला परिणाम दर्शवला आहे.

कंपनीचा दावा आहे की ज्या प्रकारे लस बनविण्यात आली आहे ती पद्धत वेगळी आहे. तंबाखूच्या झाडातून प्रोटीन काढून त्याला कोव्हिड-19 लसीच्या जिनोममध्ये मिश्रित करण्यात आले आहे. या पद्धतीमध्ये लस बनविण्यास कमी वेळ लागतो. यामुळे काही आठवड्यातच लस तयार होते.