Friendship Day 2020 : मैत्रीवर आधारित हे 5 चित्रपट प्रत्येकाने बघायलाच हवे

बॉलिवूडपासून ते हॉलिवूडच्या चित्रपटांमध्ये मैत्रीला नेहमीच साजरे करण्यात आले. जुन्या, नवीन चित्रपटांमध्ये मैत्रीचे बाँडिंग तुम्हाला पाहण्यास मिळेल. आज (30 जुलै) इंटरनॅशनल फ्रेंडशिप डे साजरा केला जात आहे. आज अशाच मैत्रीवर भाष्य करणाऱ्या चित्रपटांविषयी जाणून घेऊया.

Image Credited – The Indian Express

रंग दे बसंती –

रंग दे बसंती एक असा चित्रपट आहे, ज्यात अखेरच्या श्वासापर्यंत सर्व मित्र सोबत असतात. वर्ष 2006 मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी केले आहे. यात आमिर खानसोबत सिद्धार्थ नारायण, सोहा अली खान, कुणाल कपूर, आर माधवन, शरमन जोशी आणि अतुल कुलकर्णी यांची प्रमूख भूमिका आहे. चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळालेला आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर पाहता येईल.

Image Credited – Cinema Express

थ्री इडिएट्स –

तीन मित्र, कॉलेजच्या काळातील धमाल, मैत्री, शिक्षण पद्धती अशा विविध गोष्टींवर भाष्य करणारा हा चित्रपट एकदा नक्कीच पाहावा. 2009 साली आलेल्या या चित्रपटाला राजकुमार हिराणी यांनी दिग्दर्शित केले आहे. यात आमिर खान, शरमन जोशी, आर माधवन, करिना कपूर प्रमुख भूमिकेत आहे. हा चित्रपट अ‍ॅमेझॉन प्राईमवर उपलब्ध आहे.

Image Credited – Pinkvilla

जिंदगी ना मिलेगी दोबारा –

एक प्रवास आणि तीन मित्र. तिन्ही मित्र अनेक वर्षांनी एकत्र येऊन प्रवासाला निघतात. राग, मैत्री, प्रेम अशा अनेक गोष्टी यात पाहण्यास मिळतील. जोया अख्तरने दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात ऋतिक रोशन, अभय देओल आणि फरहान अख्तर यांची प्रमूख भूमिका आहे. प्राईम आणि नेटफ्लिक्सवर हा चित्रपट उपलब्ध आहे.

Image Credited – The Indian Express

मेरठिया गँगस्टर्स –

जीशान कादरीने गँग्स ऑफ वासेपूर लिहिल्यानंतर मेरठिया गँगस्टर बनवली. या चित्रपटात 5 मित्रांची गोष्ट दाखविण्यात आली. त्यांचे काम चोरी करणे, मज्जा-मस्ती करणे एवढेच आहे. हा चित्रपट युट्यूबवर पाहता येईल.

Image Credited – Hindustan Times

फुकरे –

या चित्रपटात दोन मित्रांची कथा सांगण्यात आली आहे. कॉमेडी चित्रपट आवडणाऱ्यांनी फुकरे बघायलाच हवा. अली फैजल, रिचा चढ्ढा, वरुण शर्मा आणि पुलकित सम्राट यांची प्रमूख भूमिका आहे. हा चित्रपट डिज्नी+ हॉटस्टारवर  उपलब्ध आहे.