‘द कपिल शर्मा शो’चा पहिला पाहुणा असणार सोनू सूद


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लागू असलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वच उद्योगधंदे ठप्प पडले होते. याला मनोरंजन क्षेत्र देखील अपवाद नव्हते. पण आता देशात अनलॉक प्रक्रिया सुरु झाल्यामुळे देशातील सर्वच उद्योगधंदे हळूहळू पुर्वपदावर येत आहे. त्यात ठप्प पडलेल्या मनोरंजन क्षेत्राचा देखील समावेश आहे. मागील अनेक महिन्यापासून बंद असलेल्या कॉमेडी शो ‘द कपिल शर्मा शो’ला सर्व अटी-शर्थींचे पालन करून शुटिंगची परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार या शोचे शुटिंग सुरु झाले आहे.

जवळपास 4 महिन्यांनंतर शोचे शुटिंग सुरु झाले असून यावेळी शोमध्ये पाहुणा म्हणून अभिनेता सोनू सूद उपस्थित होता. लॉकडाऊनंतरच्या ‘द कपिल शर्मा शो’च्या एपिसोडचे शुटिंग अभिनेता सोनू सूदने पूर्ण केले आहे. ज्यामध्ये कपिल आणि सोनू धम्माल करताना दिसणार आहेत. लॉकडाऊनमध्ये मजुरांना आपापल्या घरी पोहोण्यासाठी केलेल्या मदतीमुळे सोनू सूद चर्चेत आला होता.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, या शोमध्ये प्रवासी मजुरांसोबतचे आपले अनुभव सोनू शेअर करणार आहे. तसेच, कोरोनाच्या संकटकाळात सुरु असलेल्या शुटिंगबाबत बोलायचे झाले तर, सेटवर सर्व अटींचे पालन केले जात आहे. शोमध्ये लाईव्ह ऑडियन्सना येण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. तर त्याज्यागी कटआउट्स लावण्यात आले आहेत.