ओटीटी प्लॅटफॉर्म झी5 ने आपला स्वस्तातील प्लॅन झी5 क्लबची घोषणा केली आहे. केवळ 365 रुपयांमध्ये वर्षभर युजर्सला या प्लॅटफॉर्मचा आनंद घेता येणार आहे. या प्लॅनची खास गोष्ट म्हणजे दर्शकांना त्यांचे आवडीचे कार्यक्रम टिव्हीवर पाहण्याआधी या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहण्याची संधी मिळणार आहे. यात ठराविक झी5 चे शो, अल्ट बालाजी शो, 1000 पेक्षा अधिक चित्रपट, झी जिंदगीचे शो आणि 90 पेक्षा अधिक लाईव्ह टिव्ही चॅनेलचा समावेश आहे.
दिवसाला केवळ 1 रुपया भरून टिव्हीच्या आधी या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आवडीचे कार्यक्रम
झी5 ने याबाबत माहिती दिली की, झी5 क्लबची सुरूवात युजर्सकडून आलेल्या प्रतिक्रियांच्या आधारावर करण्यात आली आहे. भारतीय युजर्सला कमी किंमतीत मनोरंजन उपलब्ध व्हावे हा विचार अनेक दिवसांपासून होता.
हिंदीतील कार्यक्रम जसे की कुमकुम भाग्य, तामिळमधील सेमबरूथी, कन्नडमधील जोथे जोथेयली आणि मराठीमधील माझ्या नवऱ्याची बायको हे व इतर अनेक झी चे लोकप्रिय कार्यक्रम टिव्हीच्या आधी झी5 क्लबवर पाहता येईल.
सध्या झी5 च्या वार्षिक स्बस्क्रिप्शनसाठी 999 रुपये भरावे लागतात. त्यामुळे झी5 ने कमी किंमतीत अवघ्या 365 रुपयांमध्ये झी5 क्लबवरील कार्यक्रम पाहता येतील.