कारगिल विजय दिवस : हे 10 वीर जवान देशासाठी प्राणपणाने लढले - Majha Paper

कारगिल विजय दिवस : हे 10 वीर जवान देशासाठी प्राणपणाने लढले


कारगिल युध्दाला 21 वर्ष झाली आहेत, मात्र आजही कारगिल युध्दाच्या आठवणीने लोकांच्या अंगात संचारते. 26 जुलैला कारगिल विजय दिवस साजरा केला जातो. याच दिवशी भारतीय वीर जवानांनी पाढंऱ्या बर्फाच्छिदीत प्रदेशात तिरंगा फडकावला होता.

दीड महिने चाललेल्या या युध्दात भारताने 527 जवान गमावले होते तर 1300 पेक्षा अधिक जवान जखमी झाले होते. यातील शहीद झालेल्या जवानांतील बहुतांशाच जवानांचे वय 30 वर्ष देखील नव्हते.

आज आम्ही तुम्हाला अशाच वीर जवानांबद्दल माहिती देणार आहोत, ज्यांनी आपले संपुर्ण आयुष्य देशासाठी अर्पण केले.

कॅप्टन विक्रम बत्रा तेच आहेत, ज्यांनी कारगिल प्वाइंट 4875 वर तिरंगा फडकावत दिल मांगे मोर असे म्हटले होते. विक्रम बत्रा तेराव्या जम्मू आणि काश्मीर रायफल्समध्ये होते. विक्रम बत्रा यांनी तोलोलिंग येथे पाकिस्तान्यांकडून बनवण्यात आलेल्या बंकर केवळ स्वतःच्या ताब्यातच घेतले नाही तर गोळ्यांची पर्वा न करता सैनिकांना वाचवण्यासाठी 7 जुलै 1999 ला पाकिस्तानच्या सैनिकांशी भिडले आणि तिरंगा फडकवूनच अखेरचा श्वास घेतला. आज त्या ठिकाणाला बत्रा टॉप नावाने ओळखले जाते. सरकारने त्यांना परमवीर चक्र पुरस्काराने सन्मानित केले आहे.

ग्रेनेडियर योगेंद्र सिंह यादव हे कमांडो घटक प्लाटूनला मार्गदर्शन करत होते. त्यांनी एक स्ट्रॅटर्जी बनवत बंकरवर हल्ला केला. ते आपल्या पलटनसाठी दौऱ्यांचा रस्ता बनवायचे. 4 जुलैला कारगिल युध्दादरम्यान केलेल्या अदम्य साहसाबद्दल त्यांना परमवीर चक्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

कॅप्टन मनोज कुमार पांडे गोरखा रायफल्सच्या फर्स्ट बटालियनमध्ये होते. ते ऑपरेशन विजयचे महानायक होते. त्यांच्या नेतृत्वाखाली सैनिकांनी जॉबर टॉप आणि खालुबर टॉपवर पुन्हा कब्जा केला. 3 जुलै 1999 ला जखमी असताना देखील तिरंगा फडकावला. त्यांच्या या साहसासाठी त्यांना परमवीर चक्र देण्यात आले.

कॅप्टन अनुज नैय्यर जाट रेजिमेंटच्या 17 व्या बटालियनमध्ये होते. 7 जुलै 1999 ला दुश्मनांशी लढताना ते शहीद झाले. कॅप्टन यांच्या वीरतेला पाहून सरकारने त्यांना मरणोपरांत महावीर चक्र पुरस्काराने सन्मानित केले.

कॅप्टन एन केंगुर्सू हे राजपूत रायफल्सच्या दुसऱ्या बटालियनमध्ये होते. ते कारगिल युध्दादरम्यान 28 जून 1999 ला लोन हिल्सवर लढताना शहीद झाले. त्यांना सरकारने मरणोपरांत महावीर चक्र पुरस्काराने सन्मानित केले.

भारतीय सैन्यात मेजर पदमपानी आचार्या हे राजपूत रायफल्सच्या दुसऱ्या बटालियनमध्ये होते. 28 जुन 1999  ला लोन हिल्सवर लढताना ते शहीद झाले. त्यांच्या कामगिरीसाठी सरकारने त्यांना मरणोपरांत महावीर चक्र पुरस्काराने सन्मानित केले.

कर्नल सोनम वांगचुक लद्दाख स्काउट रेजिमेंटमध्ये अधिकारी होते. कारगिल युध्दादरम्यान पाकिस्तानी सैन्याशी लढताना कॉरवट टॉप येथे त्यांनी वीरगती प्राप्त झाली. त्यांना मरणोपरांत महावीर चक्र पुरस्काराने सन्मानित केले.

मेजर राजेश सिंह हे 30 मे 1999 ला कारगिल हिलवर शहीद झाले. त्यांच्या कामगिरीसाठी त्यांना मरणोपरांत महावीर चक्र पुरस्काराने सन्मानित केले.

नायक दिगेंद्र कुमार राजपूत रायफल्सच्या दुसऱ्या बटालियनमध्ये होते. कारगिल युध्दातील त्यांच्या कामगिरीसाठी त्यांना 15 ऑगस्ट 1999 ला महावीर चक्र देऊन सन्मानित करण्यात आले.

रायफल मॅन संजय कुमार 13 जम्मू-काश्मीर येथे होते.  ते स्काउट टीमचे लीडर होते. त्यांनी प्लॅट टॉप आपल्या छोट्या तुकडीबरोबर कब्जा केला. लढताना गोळी लागल्यानंतर देखील ते लढत राहिले. त्यांच्या साहसासाठी त्यांना परमवीर चक्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Leave a Comment