15 वर्षांनंतर बॉक्सिंग रिंगमध्ये पुनरागमन करणार 54 वर्षीय माईक टायसन


नवी दिल्ली – बॉक्सिंगचे नाव घेताच सर्वात प्रथम नाव येते ते दिग्गज बॉक्सर माईक टायसन यांचे. दिग्गज बॉक्सर माईक टायसन भारतातही प्रसिद्ध आहे. माइक टायसन आणि बॉक्सिंग चाहत्यांसाठी चांगली बातमी आहे, हेच बॉक्सर माईक टायसन पुन्हा एकदा बॉक्सिंग रिंगमध्ये पुनरागमन करणार आहेत.

माईक टायसन वयाच्या 54 व्या वर्षी बॉक्सिंग रिंगमध्ये पुनरागमन करणार आहेत. टायसन 12 सप्टेंबर रोजी रॉय जोन्स ज्युनिअरसोबत एका प्रदर्शनीय सामन्यात खेळतील. टायसन यांनी 2005 साली केविन मॅकब्रिजसोबत अखेरचा सामना खेळला होता. यानंतर तब्बल 15 वर्ष ते बॉक्सिंग रिंगपासून दूर होते. या लढतीसाठी आपण उत्सुक असल्याचे टायसन यांनी ट्विटरच्या माध्यमातून सांगितले आहे.

अमेरिकन बॉक्सर माईक टायसन यांचा जन्म 1966 साली न्यूयॉर्क शहरात झाला. माईक टायसन यांना बेस्ट मॅन ऑन प्लॅनेट या नावाने देखील ओळखले जाते. माईक टायसन यांनी आपल्या बॉक्सिंग कारकीर्दीत एकूण 58 सामने खेळले असून 50 सामन्यांत शानदार विजय नोंदविला. माईक टायसनचा त्याच्या कारकीर्दीत अवघ्या 6 सामन्यात पराभव झाला आहे. माईक टायसन यांनी आतापर्यंत तीन लग्ने केले असून त्यांना एकूण 8 मुले आहेत.