पहा स्टॅच्यू ऑफ लिबर्टीवर कोसळलेल्या वीजेचा थरारक व्हिडीओ

सोशल मीडियावर एक शानदार व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये न्यूयॉर्कच्या प्रसिद्ध स्टॅच्यू ऑफ लिबर्टीवर वीज कोसळतानाचा क्षण कैद करण्यात आला आहे. ट्विटर युजर मिकी सी ने हा व्हिडीओ शेअर केला आहे.

21 सेकंदांच्या या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, आकाशीय वीज स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या मागे कोसळत आहे. नेटकऱ्यांना हा थरारक व्हिडीओ खूप आवडत आहे.

ढग गडद झाले असून, आकाश काळकुट्ट झालेले व्हिडीओमध्ये दिसत आहे. व्हिडीओ स्टॅच्यू ऑफ लिबर्टीची रिकॉर्डिंग करत आहे. तेवढ्यातच वीज या पुतळ्याजवळ कोसळते. एकदा नाहीतर चार वेळा असे होते. मागे ढगांच्या गडगडाटचा आवाज देखील येत आहे.

युजरने व्हिडीओ शेअर करत लिहिले की, हा आतापर्यंतचा सर्वोत्तम व्हिडीओ आहे, जो मी कैद केला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओला आतापर्यंत 40 लाखांपेक्षा अधिक जणांनी पाहिले आहे. तर शेकडो युजर्सनी यावर मजेशीर कमेंट्स केल्या आहेत.