अॅपलची मोठी घोषणा! ‘आयफोन’मधील ‘I’चा आता उल्लेख इंडिया असणार


नवी दिल्ली – आपल्या देशातील तरुणाईमध्ये अॅपलच्या आयफोनची जबरदस्त क्रेझ आहे. आयफोनला आपल्याकडे स्टेटस सिम्बॉल म्हणून देखील ओळखला जातो. त्यामुळे आयफोनच्या नवीन मॉडलची सर्वांनाच उत्सुकता असते. पण हे फोन महाग असले तरी त्याचा मोठा ग्राहक आहे. त्यातच अॅपलने भारतीयांसाठी एक आनंदाची बातमी जाहीर केली आहे.

अॅपल आता आयफोन11ची निर्मिती भारतात करणार असल्यामुळे आपल्या देशात प्रथमच आयफोनची निर्मिती होणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या मेक ईन इंडिया मोहिमेसाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे. त्याशिवाय चीनच्या कुरापतींमुळे देशात चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याची मागणी जोर धरत असतानाच अॅपलच्या या निर्णयामुळे चीनलाही मोठा धक्का बसल्याची चर्चा सुरू झाली आहे. यासंदर्भातील वृत्त ‘इकॉनॉमिक टाईम्स’ने दिले आहे.

अॅपलच्या या फोनची निर्मिती चेन्नईत केली जाणार असून त्याचे उत्पादन टप्प्याटप्प्याने वाढवण्यात येणार आहे. भारतात तयार होणाऱ्या या आयफोन 11ची निर्यातही केली जाऊ शकते. त्यामुळे चीनवर आता अधिक विसंबून राहणे कमी करता येईल, ‘असे उद्योग क्षेत्रातील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘इकॉनॉमिक टाईम्स’ला सांगितले. भारतात चीनमध्ये तयार झालेल्या आयफोन 11 ची विक्री करण्याच्या पर्यायाचा विचार सध्या करत नसल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. अॅपलच्या या निर्णयामुळे त्यांचा 22% आयात कर वाचणार आहे.

त्याचबरोबर आयफोन SE च्या निर्मितीचा विचार बंगळुरू येथील विस्ट्रोन प्लांट येथे सुरू असल्याचेही कंपनीकडून सांगण्यात आले आहे. production linked incentive (PLI) schemeचा फायदाही केंद्राकडून अॅपलला मिळणार आहे. देशातील अॅपल उप्तादनाच्या स्थानिकीकरणातही त्यांच्या या निर्णयामुळे वाढ होणार आहे. याशिवाय चीनबाहेर अॅपलला त्यांच्या उप्तादनाचे जाळे पसरवता येणार आहे.