राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांना कोरोनाची लागण


औरंगाबाद – शिवसेना आमदार तसेच ठाकरे सरकारमधील राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती त्यांनी स्वतः फेसबुकच्या माध्यमातून दिली आहे. त्यांना आपल्या प्रकृतीबाबत शंका आल्याने त्यांनी स्वतःची कोरोना चाचणी केली. त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांनी स्वतःला घरातच क्वारंटाइन केले आहे. तसेच माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली तपासणी करून घ्यावी व योग्य तो उपचार घेऊन “होम क्वांरांटाईन” व्हावे, असे आवाहन सत्तार यांनी केले आहे. सत्तार यांनी कोरोना काळात आपल्या मतदारसंघात विविध ठिकाणी जाऊन परिस्थितीतचा आढावा घेत होते.

थोडी शंका आली होती म्हणून आज कोरोना तपासणी केली,दुर्दैवाने रिपोर्ट पॉजीटीव्ह आली आहे परंतु घाबरण्याची आवश्यक्ता नाही ,या…

Posted by Abdul Sattar on Tuesday, July 21, 2020

आपल्या फेसबुक पोस्टमध्ये अब्दुल सत्तार यांनी थोडी शंका आली होती म्हणून आज कोरोना तपासणी केली,दुर्दैवाने रिपोर्ट पॉजीटीव्ह आली आहे परंतु घाबरण्याची आवश्यक्ता नाही ,या कोरोना प्रादूर्भावाच्या काळात अनेक ठिकाणी मदतकार्य करतांना चुकून प्रादुर्भाव झाला असेल परंतु आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने मी लवकरच बरा होऊन परत आपल्या सेवेत तत्पर होईल, असे म्हटले आहे. मुंबईतील लीलावती रुग्णालयात डॉ जलील पारकर यांच्याकडून उपचार घेत असून मी मुंबई येथेच “होम क्वांरांटाईन” आहे, माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली तपासणी करून घ्यावी व योग्य तो उपचार घेऊन “होम क्वांरांटाईन” व्हावे, असे सत्तार म्हणाले.