खुन्याला पकडण्यासाठी 12 किमी धावली कुत्री, विशेष कामगिरीसाठी केले सन्मानित

कर्नाटक पोलीस दलातील एका कुत्रीचे सध्या विशेष कौतुक होत आहे. हा एक स्निफर डॉग आहे. म्हणजेच हा कुत्रा वास घेऊन आरोपीचा मागोवा घेत पोलिसांना पकडण्यासाठी मदत करतो. पोलीस दलातील या कुत्रीने 12 किमी धावत एका खुन्याला पकडण्यासाठी मदत केली आहे.

कर्नाटकच्या दवेंगेरे जिल्ह्यातील ही घटना असून, येथे एका व्यक्तीने दुसऱ्याकडून पैसे उधारी घेतले होते. दोघांमध्ये पैशावरून वाद झाला व एकाने दुसऱ्यावर गोळी चालवली. ज्या बंदुकीने गोळी चालविण्यात आली, ती देखील पोलीस स्टेशनमधूनच चोरी करण्यात आली होती. ज्या व्यक्तीने गोळी चालवली त्याचे नाव चेतन होते. आधीपासूनच त्याच्याविरोधात अनेक गुन्हे दाखल होते. चेतनने चंद्रा नायककडून 1.7 लाख रुपये घेतले होते.

Image Credited – TOI

10 वर्षीय तुंगा नावाच्या कुत्रीला चेतनचा शोध घेण्यासाठी आणण्यात आले. तिने या आधी 50 मर्डर आणि 60 चोरीची प्रकरण सोडवली आहेत. चेतन शेवटचा जेथे होता, पोलीस तेथे तुंगाला घेऊन गेले. तेथून वास घेत घेत तुंगा 12 किमी धावली व एका घरासमोर जाऊन थांबली.

यानंतर पोलिसांनी तपास सुरू केल्यावर, चेतन त्याच घरात आढळला. पोलिसांनी चौकशी केल्यावर त्याने गुन्हा कबूल केला. त्याने हुबली पोलीस स्टेशनमधून बंदूक चोरी केल्याचे देखील मान्य केले. तुंगामुळे या गुन्हेगाराला पकडणे शक्य झाले. या विशेष कामगिरीसाठी पोलीस विभागाने तिचा सन्मान देखील केले.

Loading RSS Feed