आता विकास दुबेच्या भावाच्या शोधात पोलीस, 20 हजारांचे इनाम जाहीर

उत्तर प्रदेशचा गँगस्टर विकास दुबे पोलिसांसोबतच्या चकमकीत मारला गेला होता. आता पोलीस त्याच्या गँगमधील अन्य साथीदारांची धरपकड करत आहे. पोलीस त्याचा भाऊ दीप प्रकाश दुबेचा शोध घेत आहेत. पोलिसांनी माहिती देण्यासाठी 20 हजार रुपयांचे इनाम देखील घोषित केले आहे. विकास दुबे आणि त्याच्या साथीदारांनी 8 पोलिसांची हत्या केली होती. त्या दिवसापासूनच दीप प्रकाश दुबे फरार आहे.

पोलिसांनी विकास दुबेसह त्याच्या दोन साथीदारांचा एन्काउंटरमध्ये खात्मा केला होता. यानंतर आता पोलीस त्याच्या अन्य साथीदारांचा शोध घेत आहेत. त्याच्या काही जवळच्या व्यक्तींना देखील अटक करण्यात आले आहे. मात्र काही अद्याप फरार आहेत. त्यातीलच एक त्याचा भाऊ दीप प्रकाश आहे.

दीप प्रकाश संदर्भात पोलीस लखनऊ-कानपूरसह अनेक ठिकाणी तपास करत आहे. अनेकांची चौकशी करत आहे. तो 2 जुलैच्या रात्रीपासून फरार आहे.  

Loading RSS Feed