…तर कंगणाने बॉलिवूडला रामराम ठोकावा – करण जोहर


एका मुलाखती दरम्यान बॉलीवूडचा डॅडी अर्थात करण जोहर याने जर अभिनेत्री कंगणा राणावतला बॉलीवूडमध्ये अनेक समस्यांचा सामना करावा लागत असेल, तर तिने खुशाल बॉलीवूडला रामराम करावा, असे म्हटले आहे. सुशांत सिंह राजपुतच्या आत्महत्येनंतर बॉलीवूडविरोधात आक्रमक झालेली कंगणा सध्या सोशल मीडियात कायम चर्चेत आहे. याच दरम्यान ती वारंवार बॉलीवूडवर आगपाखड करत असते.

सुशांत सिंह राजपुतच्या आत्महत्येला जबाबदार धरत दिग्दर्शक करण जोहर, सलमान खान, एकता कपूर यांच्यावर सातत्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून सतत सोशल मीडियाच्या माध्यमातून टीका होत आहे. दरम्यान करण जोहरचा एक व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये करण जोहरचा कंगनावर असलेला संताप स्पष्ट झळकत आहे. प्रत्येकवेळी कंगणाने असे भासवले आहे की तिच्यावर बॉलीवूडमध्ये कायम अन्याय होत आला आहे. असे असेल तर तिने खुशाल बॉलीवूडला रामराम ठोकावा. तिला कोणीही थांबवणार नसल्याचे वक्तव्य करण जोहरने केले आहे.

दरम्यान, सध्या बॉलिवूडमध्ये सुशांतच्या आत्महत्येनंतर वादळ आलेले आहे. १४ जुन रोजी सुशांतने अखेरचा श्वास घेतला. पण त्याच्या आत्महत्येमागील रहस्य अद्याप उलगडलेले नाही. याप्रकरणी आतापर्यंत ३५ पेक्षा जास्त जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत.