भाजपच्या फायरब्रांड नेत्या कडाडल्या; पवारांचा विरोध मोदींना नसून थेट प्रभु श्रीरामांना


नवी दिल्ली – राम मंदिराबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी केलेले वक्तव्य हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधातील नसून ते प्रभू श्रीरामांनाच्या विरोधातील असल्याची टीका भाजपच्या ज्येष्ठ नेत्या उमा भारती यांनी केल्यामुळे आता आता भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

राम मंदिराचे निर्माण केल्याने कोरोनाचा नाश होईल असे सत्ताधारी मोदी सरकारला वाटत असल्यामुळे या मंदिराच्या भूमिपूजनाची तारीख आणि इतर चर्चा होत आहेत. कोरोना राम मंदिरामुळे दूर जाणार आहे का? असा सवाल त्यांनी विचारला होता. राम मंदिरांचे निर्माण केल्यामुळे कोरोनाचा नाश होणार असले तर तुम्ही खुशाल भूमिपूजन करा, असे वक्तव्य त्यांनी सोलापुरात केले होते.

शरद पवार यांनी सोलापुरात केलेल्या याच वक्तव्याचे पडसाद आता उमटू लागले आहेत. भाजपाच्या फायरब्रांड नेत्या उमा भारती यांनी या वकव्याचा संदर्भ घेऊन शरद पवारांवर टीका केली आहे. शरद पवार यांनी केलेलं वक्तव्य हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना विरोध करणारे नाही तर थेट प्रभू रामचंद्रांना विरोध करणारे आहे. आम्ही हा विचार करतो आहोत की कोरोना दूर कसा निघून जाईल. अशात काही लोकांना वाटते की मंदिर बांधल्याने कोरोना जाईल. हे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदींना विरोध करणारे नाही तर प्रभू रामचंद्रांना विरोध करणारे आहे.