दिल बेचारा चित्रपटातील नवे कोरे गाणे तुमच्या भेटीला


लवकरच अभिनेता सुशांत सिंह राजपूत याचा शेवटचा चित्रपट दिल बेचारा हा रिलीज होणार आहे. तत्पूर्वी चित्रपटातील गाणी रिलीज करण्यात येत आहेत. ‘दिल बेचारा टायटल ट्रॅक’ आणि ‘तारे गिन’नंतर आणखी एक नवे कोरे गाणे नुकतेच रिलीज करण्यात आले आहे. ‘खुलके जीने का’ असे शीर्षक असलेले हे गाणे रिलीज करण्यात आले असून यात सुशांत आणि संजना सांघी यांची सुंदर केमिस्ट्री दिसून येत आहे.

पॅरिसमध्ये ‘खुलके जीने का’ गाणे चित्रित झाले असून अरिजीत सिंह याने हे गाणे गायले असून गाण्याचे बोल अभिजीत भट्टाचार्या यांनी लिहिले आहेत. याआधी मुकेश छाबडा यांनी गाण्याच्या शूटिंग दरम्यानचे काही फोटो शेअर केले होते. सुशांत, संजना आणि मुकेश यांनी पॅरिसमध्ये शूटींग दरम्यान वेळ एकत्र घालवला होता. गाण्याचे पोस्टर संजनाने देखील शेअर केले आहे. दिल बेचारा या चित्रपटातून संजना सांघी बॉलिवुडमध्ये पदार्पण करत आहेत. कॉस्टिंग डायरेक्टर मुकेश छाबडा हे देखील दिग्दर्शक म्हणून पदार्पण करत आहेत.

Loading RSS Feed