‘बाहुबली’सोबत स्क्रिन शेअर करणार बॉलिवूडची ‘मस्तानी’


बॉलिवूडची ‘मस्तानी’ अर्थात अभिनेत्री दीपिका पादुकोण आपल्या आगामी चित्रपटात ‘बाहुबली’ फेम प्रभाससोबत स्क्रिन शेअर करणार असल्याची माहिती दीपिकाने एक व्हिडीओच्या माध्यमातून दिली आहे.

प्रभासचा हा चित्रपट 21 वा चित्रपट असल्यामुळे ‘प्रभास 21’ असे या चित्रपटचे नामकरण करण्यात आले आहे. हा चित्रपट दिग्दर्शक नाग अश्विन दिग्दर्शित करणार असून या चित्रपटाच्या माध्यमातून दीपिका तेलुगू सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे.

राजमौलींच्या ‘बाहुबली’मुळे प्रभास चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनला आहे. तर आपल्या कारकिर्दीत पद्मावत, बाजीराव मस्तानी, छपाक असे चित्रपट देणारी दीपिका देखील यशाच्या शिखरावर आहे. आता हे दोन्ही सुपरस्टार एकत्र येणार म्हटल्यावर चाहत्यांच्या उत्कंठता वाढली आहे. त्याचबरोबर सोशल मीडियावर दीपिका व प्रभासची नावे ट्रेंड होत होते. पुढील वर्षी एप्रिलमध्ये या चित्रपटचे शूटिंग सुरू होणार असून हा चित्रपट साधारण 2022 मध्ये रिलीज होण्याची शक्यता आहे.

दीपिकासोबत काम करण्यास दिग्दर्शक नाग अश्विन प्रचंड उत्सुक आहेत. दीपिकासोबत काम करण्यास मी प्रचंड उत्सुक आहे. आजपर्यंत कुठल्याही नंबर 1 अभिनेत्री असे काही केले नसेल. तिची भूमिका सर्वांना हैराण करेल. दीपिका व प्रभासची जोडी या चित्रपटाच्या केंद्रस्थानी असेल. हा चित्रपट मोठा इतिहास रचेल, यात काही शंका नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.