कुणाल खेमूच्या खळखळून हसायला लावणाऱ्या आगामी ‘लुटकेस’चा ट्रेलर रिलीज


लवकरच एका नव्या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेता कुणाल खेमू प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याच्या आगामी चित्रपटाचे ‘लुटकेस’ असे नाव असून त्याचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर करत कुणालने ही माहिती दिली.

या चित्रपटाचे पोस्टर काही दिवसापूर्वी रिलीज करण्यात आल्यानंतर आता चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्यामुळे प्रेक्षकांना आता चित्रपट प्रदर्शनाची ओढ लागली आहे. अभिनेता कुणाल खेमू या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार असून हा कॉमेडी चित्रपट असल्याचे दिसून येत आहे. एका पैशाने भरलेल्या बॅगभोवती या चित्रपटाची कथा फिरत असल्याचे रिलीज झालेल्या ट्रेलरमधून लक्षात येत आहे. डिझ्नी हॉटस्टारवर ३१ जुलै रोजी फॉक्स स्टार स्टुडिओ निर्मित हा चित्रपट रिलीज होणार आहे. दरम्यान, या चित्रपटात कुणालसोबत रसिका दुगल, रणवीर शौरी, विजय राज हे कलाकार झळकणार आहेत.