नेटफ्लिक्सची धमाकेदार घोषणा, लवकरच येणार 17 भारतीय ओरिजनल्स

ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सने मोठी घोषणा केली असून, येणाऱ्या काही दिवसांमध्ये 17 भारतीय ओरिजनल्स रिलिज होणार असल्याची माहिती दिली आहे.. या मध्ये जान्हवी कपूर, नवाजुद्दीन सिद्दीकी, संजय दत्त, बॉबी देओल आणि काजोल यांच्या प्रमूख भूमिका आहेत.

या आधी अ‍ॅमेझॉन प्राईम आणि डिज्नी प्लस हॉटस्टार यांनी देखील अनेक चित्रपट, ओरिजनल्सची घोषणा केली होती. लॉकडाऊनमुळे थेएटरबंद असल्याचा पुर्ण फायदा ओटीटी प्लॅटफॉर्म्स घेत आहेत.

View this post on Instagram

Are you excited or ARE YOU EXCITED?!

A post shared by Netflix India (@netflix_in) on

जान्हवी कपूरची प्रमूख भूमिका असलेला गुंजन सक्सेना हा चित्रपट 12 ऑगस्टला रिलिज होणार आहे. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने हा चित्रपट भारतीय प्रेक्षकांच्या भेटाला येणार आहे. यानंतर संजय दत्तचा ‘टोरबाज’, भूमि पेडनेकरचा ‘डॉली किट्टी और वो चमकते सितारे’, नवाजुद्दीन सिद्दीकीचा ‘रात अकेली है’, राजकुमार रावचा ‘लूडो’, बॉबी देओलचा ‘क्लास ऑफ 83’, तब्बूचा ‘अ सूटेबल बॉय’, काजोलचा ‘त्रिभंगा’, नवाजुद्दीन सिद्दीकीचा ‘सीरियस मॅन’ हे चित्रपट आणि सीरिज रिलीज होणार आहेत.

याशिवाय ‘गिन्नी वेड्स सन्नी’, ‘मिसमॅच्ड’, ‘एके वर्सेज एके’, ‘बॉम्बे रोज’, काली खुई’, ‘भाग बीनी भाग’, ‘बॉम्बे बेगम्स’ आणि ‘मसाबा मसाबा’ देखील नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे.