अरेच्चा! चक्क बँड-बाजा घेऊन फरार आरोपीच्या घरे पोहचले पोलीस

बिहार पोलीस गुन्हेगारांना पकडण्यासाठी हटके पद्धतीचा वापर केल्याने अनेकदा चर्चेत असते. कधी चोराला पकडण्यासाठी तांत्रिकाची मदत घेणे, तर कधी नियमांचे पालन न करणाऱ्यांचा विमा काढते. यावेळी बिहार पोलिसांनी गुन्हेगारांना पकडण्यासाठी वेगळी पद्धत शोधली आहे. भागलपूर येथील मडवा जिल्ह्यात पोलीस आरोपींना पकडण्यासाठी थेट बँड-बाजा घेऊनच पोहचले.

भागलपूर पोलीस फरार आरोपीच्या घरी बँड-बाजा घेऊन पोहचले व त्याला सरेंडर करण्यास सांगितले. याशिवाय त्यांनी घराबाहेर न्यायालयाची नोटीस चिटकवली व कुटुंबातील सदस्यांना आरोपींच्या आत्मसमर्पण करण्यास मदत करावी असे सांगितले.

पोलीस प्रमुख आणि स्टेशन हाउस ऑफिसर(एसएचओ) पवन कुमार म्हणाले की, आम्ही आरोपींच्या कुटुंबाला चेतावणी दिली आहे की दिलेल्या वेळेच्या आत आत्मसमर्पणात मदत करावी. अन्यथा संपत्ती जप्त केली जाईल व कारवाई होईल. यातील एका आरोपीचे नाव चंदन यादव आहे.

पोलीस बँड-बाजासह आरोपींच्या घरी पोहचल्याने, आजुबाजूच्या लोकांनी देखील पाहण्यासाठी गर्दी केली. सोशल मीडियावर याचे फोटो व्हायरल होत आहेत.