17 जुलैपासून संपूर्ण सातारा जिल्हा लॉकडाऊन; जाणून घ्या काय सुरु, काय बंद?


सातारा : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव सातारा जिल्ह्यातही दिसून येत असून कोरोना बाधितांच्या आकडेवारीत दिवसागणिक वाढ होत असल्यामुळे सातारा जिल्हा लॉकडाऊन करण्यात यावा अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत होती. तरी देखील अंशतः दुकाने सुरु ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण दिवसेंदिवस कोरोना बाधितांचा आकडा वाढतच होता.

दरम्यान काल साताऱ्यातील विविध प्रशासकीय यंत्रणेच्या अधिकाऱ्यांची कोरोनाची साखळी तोडण्यासाठी बैठक बोलावली होती. बैठकीत करण्यात आलेली चर्चेत साताऱ्यामध्ये पुन्हा लॉकडाऊन जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला. 17 जुलैपासून 22 जुलैपर्यंत संपूर्ण सातारा जिल्हा लॉकडाऊन करण्याचा अध्यादेश या बैठकीत काढण्यात आला आहे. पाच दिवसांच्या लॉकडाऊनंतर 22 जुलै ते 26 जुलैपर्यंत सकाळी 9 ते दुपारी 2 या कालावधीतच अत्यावश्यक सेवा देणारी दुकाने उघडी राहणार असल्याचेही या अध्यादेशातून सांगण्यात आले आहे.

सातारा जिल्ह्यात लॉकडाऊन दरम्यान काय बंद असणार आणि काय सुरु :

 1. 17 जुलैपासून 22 जुलैपर्यंत सर्व किराणा दुकाने, सर्व किरकोळ आणि ठोक विक्रेते, सर्व इतर व्यवसाय करणारे व्यापारी दुकाने बंद राहणार आहेत. त्यानंतर ही दुकाने 22 जुलै ते 26 जुलै या कालावधीत सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेत सुरु राहतील.
 2. उपहारगृह, बार, लॉज, हॉटेल्स, रिसॉर्ट, मॉल,बाजार, मार्केट संपुर्णत: बंद राहतील.
 3. 17 जुलैपासून 22 जुलैपर्यंत वाईन शॉप, बिअर शॉपी, देशी दारु दुकाने बंद राहणार आहेत. त्यानंतर 22 जुलै ते 26 जुलै या कालावधीत घरपोच सुविधा सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.
 4. झोमॅटो, स्विगी, डॉमिनोज आणि इतर ऑनलाईन पोर्टलवरुन मार्गविले जाणारे खादयपदार्थ पुरवठा सेवा तसेच हॉटेल रेस्टॉरंट यांचेमार्फत देणेत येणारी घरपोच सेवा 17 जुलैपासून 22 जुलैपर्यंत बंद राहणार आहेत. त्यानंतर 22 जुलै ते 26 जुलै या कालावधीत घरपोच सुविधा सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.
 5. सार्वजनिक ठिकाणे, खाजगी क्रिडांगणे, मोकळ्या जागा, उद्याने, बगीचे हे संपुर्णत: बंद राहतील. तसेच
 6. सार्वजनिक ठिकाणी मॉर्निंग वॉक आणि इव्हिनिंग वॉक करण्यासही परवानगी दिलेली नाही.
 7. ब्युटी पार्लर्स, सलून, स्पा दुकाने पूर्णतः बंद ठेवण्यात येणार आहेत.
 8. 17 जुलैपासून 22 जुलैपर्यंत भाजीपाला मार्केट, फळ विक्रेते यांची दुकाने बंद राहणार आहेत. त्यानंतर 22 जुलै ते 26 जुलै या कालावधीत सकाळी 9 ते दुपारी 2 या कालावधीतच अत्यावश्यक सेवा देणारी दुकाने उघडी राहणार आहेत.
 9. मटन, चिकन, अंडी, मासे इत्यादी पदार्थांची विक्री 17 जुलैपासून 22 जुलैपर्यंत बंद राहणार आहेत. त्यानंतर 22 जुलै ते 26 जुलै या कालावधीत सकाळी 9 ते दुपारी 2 या कालावधीत सुरु राहतील.
 10. शाळा, महाविदयालय, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था सर्व प्रकारचे शिकवणी वर्ग संपूर्णतः बंद राहतील
 11. सार्वजनिक व खाजगी प्रवासी वाहने दोन चाकी, तीन चाकी व चार चाकी संपूर्णत: बंद राहतील, तथापि अत्यावश्यक सेवेनील वाहने, पूर्व परवानगी प्राप्त वाहने तसेच विमानतळ, रेल्वे स्टेशन येथे जाणे येणे करिता व वैदयकीय कारणास्ताव प्रवासासाठी खाजगी वाहनांचा वापरास परवानगी राहील.
 12. सार्वजनिक प्रवासी वाहतूकीतील एसटी बस ही अत्याश्यक सेवेच्या खाजगी आणि शासकीय कर्मचाऱ्यांसाठी, शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आणि परवानगी घेऊन चालू असलेल्या उदयोगातील अधिकृत कर्मचारी यांच्यासाठी परवानगी राहील. तसेच अत्यावश्यक वस्तू यांचा घाऊक स्वरुपात पुरवठा करणारी वाहतूक सदरच्या आदेशातून वगळण्यात आली आहे.
 13. सर्व प्रकारची खाजगी बांधकामे/कन्स्ट्रशनची कामे संपूर्णतः बंद राहतील, तथापि ज्या बांधकामाच्या जागेवर कामगारांसाठी निवास व्यवस्था असेल त्यांना काम सुरु ठेवता येईल. तसेच शासनाची शासकीय कामे चालू राहतील.
 14. सर्व चित्रपटगृह, व्यायामशाळा, जलरतरण तलाव, करमणुक व्यवसाय, नाटयगृह, कलाकेंद्र प्रेक्षागृह, सभागृह संपुर्णतः बंद राहतील.
 15. सर्व प्रकारचे मंगल कार्यालय, हॉल तसेच लग्न समारंभ, स्वागत समारंभ संपूर्णतः बंद राहतील, मात्र दिनांक 14 जुलैपुर्वी परवानगी घेण्यात आलेले खाजगी जागेतील आणि मंगल कार्यालयातील लग्न समारंभास 20 पेक्षा कमी व्यक्तीच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम करता येतील
 16. सामाजिक, राजकीय, क्रिडा, मनोरंजन, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम आणि सभा संपूर्णतः बंद राहतील.
  धार्मिक स्थळे, सार्वजनिक प्रार्थनास्थळे ही सामान्य व्यक्तीकरिता बंद राहतील, तथापि, सर्व धार्मिक स्थळ, सार्वजनिक प्रार्थनास्थळातील नित्य नियमाचे धार्मिक कार्यक्रम संबंधित धर्मगुरु, पुजारी यांना करता येतील.
  एलपीजी गॅस सेवा, घरपोच गॅस वितरण, रेशन दुकान नियमानुसार सुरु राहील.
 17. दूध विक्री व घरपोच दुधाचे वितरण सकाळी. 06.00 ते. 10.00 या कालावधीत सुरु राहील.
 18. पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरला नियमानुसार परवानगी राहील.
 19. निर्यात होणाऱ्या वस्तूंची वाहतूक शासन नियमानुसार सुरु राहील.
 20. सर्व मेडीकल दुकाने सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेत चालू रहतील, तथापि, ऑनलाईन औषध वितरण सेवा व हॉस्पिटल संलग्न औषधांची दुकाने 24 तास कालावधीकरीता सुरु राहतील.
 21. औद्योगिक व अत्यावश्यक वस्तुंची पुरवठा साखळी अबाधित ठेवण्यासाठी आवश्यक अशी स्थानिक, आंतरजिल्हा, आंतरराज्य वाहतूक शासकीय नियमानुसार सुरु राहील.
 22. शेती व दुग्ध व्यवसाय तसेच कुक्कुटपालन या अनुषंगीक कामे करण्यासाठी मान्यता राहील.
 23. सर्व न्यायालये व राज्य शासनाचे/केंद्र शासनाचे कार्यालय तसेच शासन अंगीकृत उपक्रम व स्थानिक स्वराज्य संस्थांची कार्यालये सुरु राहतील, शक्य असल्यास वर्क फ्रॉम होमचा पर्याय वापरण्यात यावा.
 24. शासकीय कार्यालयांना आवश्यक कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक पासची आवश्यकता राहणार नाही. तथापि संबंधित शासकीय कर्मचाऱ्याने स्वतः चे ओळखपत्र सोबत बाळगणे आवश्यक राहील.

Leave a Comment