उद्या जाहीर होणार सीबीएसई दहावीचा निकाल; रमेश पोखरियाल यांची माहिती


नवी दिल्ली – उद्या म्हणजेच 15 जुलै रोजी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) चा दहावी बोर्डाचा निकाल जाहीर होणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री रमेश पोखरियाल यांनी ट्विट करून माहिती दिली आहे. उद्या निकाल जाहीर होताच आपण cbseresults.nic.in या अधिकृत वेबसाईटवर आपला रिझल्ट तपासून पाहू शकता. याशिवाय, results.nic.in,cbse.nic.in या वेबसाईटवर सुद्धा निकाल पाहायला मिळणार आहे.


त्याचबरोबर आपण आपल्या शाळेतून ऑफलाईन रिझल्ट सुद्धा जाणून घेऊ शकता. तसेच DigiLocker App, DigiResults App, Umang App च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना थेट त्यांची गुणपत्रिका प्राप्त करता येईल यासाठी झोनल ऑफिसमध्ये जाण्याची गरज लागणार नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या, त्यामुळे सरासरी आणि अंतर्गत मूल्यमापन गुणपद्धतीच्या आधारे निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

काही वेळापूर्वी रमेश पोखरियाल यांनी ट्विट करून दहावी सीबीएसईच्या विद्यार्थी व पालकांना यासंदर्भात माहिती दिली. मात्र अद्याप त्यांनी वेळ न सांगितल्यामुळे विद्यार्थ्यांनी cbseresults.nic.in ही साईट तपासावी. निकाल तपासताना प्रवेशपत्र किंवा हॉल तिकिट जवळ ठेवा कारण रोल नंबर इत्यादी तपशिलांसाठी हे आवश्यक आहे. दरम्यान, काल सीबीएसई तर्फे बारावी बोर्डाचा निकाल जाहीर करण्यात आला होता. सीबीएसई तर्फे सरासरी आणि अंतर्गत मूल्यमापन गुणपद्धतीच्या आधारे निकाल जाहीर केला गेला होता. यानुसार यंदा 88.78%.निकाल लागला आहे.

Leave a Comment