राज्यात अंतिम वर्षांच्या परीक्षा न घेण्याचा निर्णयावर ठाकरे सरकार ठाम


मुंबई – महाराष्ट्रातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्यात तूर्तास परीक्षा न घेण्याच्या निर्णयावर राज्य सरकार ठाम आहे. यासंदर्भात इतर राज्यांशीही चर्चा केली जाणार आहे. परीक्षांबाबत न्यायालयात विद्यापीठ याचिका दाखल असल्याने वाट पाहणार अशीही भूमिका सरकारने घेतली आहे.

राज्य आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक आज दुपारी १ वाजता मंत्रालयात पार पडली. यावेळी विद्यापीठ अंतिम वर्षांच्या परीक्षांबाबत चर्चा झाली. त्यामध्ये परीक्षा न घेण्याच्या निर्णयावर ठाकरे सरकार ठाम असल्याचा निर्णय झाला. महाराष्ट्रासह सहा राज्यांनी विद्यापीठांच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्यास विरोध केला असला तरी मनुष्यबळ विकास मंत्रालयाने विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (युजीसी) मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट केले आहे. गुणवत्ता आणि भविष्यातील संधीसाठी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक मूल्यांकन महत्त्वाचे असल्याचेही मंत्रालयाने म्हटले आहे.

Loading RSS Feed

Leave a Comment