VIDEO; अवघ्या 10 सेकंदात जगातील सर्वात मोठे स्टेडियम जमिनदोस्त


मिशिगन : स्फोटके लावून अमेरिकेतील मिशिनग येथील सर्वात मोठे मैदान जमिनदोस्त करण्यात आले. तीन चॅम्पियनशिप डेट्रॉईट पिस्टन संघ आणि तीन डेट्रॉईट शॉक संघांचे अॅबर्न हिल्सच्या पॅलेस हे घर होते. येथे जवळजवळ 30 वर्ष विविध कार्यक्रम राबवले जात होते. पण हे स्टेडियम शनिवारी स्फोटके लावून जमिनदोस्त करण्यात आले. सध्या सोशल मीडियावर याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.


यासंदर्भात एबीसी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार या पॅलेसची निर्मिती 1988 मध्ये करण्यात आली होती. तर या स्टेडियममध्ये 22,000 हून अधिक लोक एनबीए सामने पाहण्यासाठी जमायचे तर, येथे देशातील मोठमोठ संगीत कार्यक्रमांचे आयोजनही होत होते.

2017मध्ये डेट्रॉईट डाउनटाउनमध्ये स्थानांतरित केल्यानंतर पिस्टन्सने येथे संगीताचे कार्यक्रम, कॉन्सर्ट यांचे आयोजन करण्यात आले. 2017मध्ये येथे शेवटचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. रॉकर बॉब सेगर यांची कॉन्सर्ट येथे पार पडल्यानंतर मागील 3 वर्षात येथे एकाही कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले नव्हते. दरम्यान, य़ेथे एक नवीन विकास प्रकल्प योजनाबद्ध आहे. देशातील अनेक कंपन्या येथे गुंतवणूक करण्यास तयार आहेत. ही जागा देशातील आकर्षक जागांपैकी एक असल्यामुळे येथे लवकरच एक मोठी वास्तू उभारण्यात येणार आहे.

Leave a Comment