कोरोना 100 वर्षातील सर्वात वाईट आरोग्य आणि आर्थिक संकट – शक्तिकांत दास

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (आरबीआय) गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज एसबीआय बॅकिंग आणि इकॉनॉमिक्स कॉन्क्लेव्हमध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाचे चेअरमन रजनीश कुमार यांच्याशी व्हिडीओ कॉन्फ्रंसद्वारे चर्चा केली आहे. सध्या कोरोना व्हायरस देशाची आर्थिक स्थिती बिकट आहे, अशा स्थितीमध्ये हे कॉन्क्लेव्ह होत आहे.

कॉन्क्लेव्हमध्ये शक्तिकांत दास म्हणाले की, कोरोना व्हायरस मागील 100 वर्षातील सर्वात वाईट आरोग्य आणि आर्थिक संकट आहे. यामुळे उत्पादन आणि नोकऱ्यांवर वाईट परिणाम झाला आहे. याने जगभरातील व्यवस्था, श्रम आणि गुंतवणुकीला कमी केले आहे. सध्याच्या स्थितीमध्ये आर्थिक वृद्धी करणे सरकारची प्राथमिकता आहे.

दास म्हणाले की, भारतीय रिझर्व्ह बँकेने आर्थिक तंत्र सुरक्षित ठेवणे, सध्याच्या स्थितीमध्ये अर्थव्यवस्थेला मदत करण्यासाठी अनेक महत्त्वाची पावले उचलली. या संकटाच्या काळात भारतीय कंपन्या आणि उद्योगांनी चांगले काम केले आहे. लॉकडाऊनवरील निर्बंध हटवल्यानंतर भारतीय अर्थव्यवस्था पुन्हा सामान्य स्थितीमध्ये परतत असल्याचे संकेत दिसत आहेत.

Leave a Comment