कोरोना : ईडन गार्डन स्टेडियममध्ये पोलिसांसाठी बनणार क्वारंटाईन सेंटर

ईडन गार्डन स्टेडियमचा वापर आता कोरोना व्हायरस विरुद्धच्या लढ्यात कोलकत्ता पोलिसांच्या मदतीसाठी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोलकत्ता पोलिसांनी क्रिकेट असोसिएशन बंगालला (सीएबी) विनंती केली की ईडन गार्डन्सच्या गॅलेरीजला पोलिसांसाठी क्वारंटाईन सुविधा करण्याची परवानगी द्यावी.

लालबाजार येथील कोलकत्ता पोलीस हेडक्वार्टर्स आणि सीएबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यानंतर ईडन गार्डन्सचे इंस्पेक्शन करण्यात आले. गॅलेरी ई, एफ, जी आणि एचला क्वारंटाईन फॅलिसिटीमध्ये बदलले जाईल. अधिक जागेची गरज पडल्यास जे गॅलेरीचा देखील वापर केला जाईल.

सुरक्षेची काळजी घेऊन या भागांना वेगळे ठेवले जाईल. ब्लॉक बी, सी, डी, के आणि एलचा वापर केला जाणार नाही, कारण याचा वापर प्रशासकीय कारवाईसाठी केला जातो. ग्राउंडमन आणि अन्य कर्मचाऱ्यांना सुरक्षित जागी हलवले जाणार आहे.

दरम्यान, आतापर्यंत 544 कोलकत्ता पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असून, 411 जण बरे झाले आहेत.

Leave a Comment