कोरोनावर शरद पवार म्हणतात, ‘ऑगस्ट आणि सप्टेंबरपर्यंत सर्व पूर्वपदावर येईल; मात्र…’

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घेतलेल्या बहुप्रतिक्षित मुलाखतीचा पहिला भाग आले आहे. या मुलाखतीमध्ये शरद पवार यांनी कोरोना व्हायरस, महाविकास आघाडी, बाळासाहेब ठाकरे, देवेंद्र फडणवीस अशा विविध मुद्यांवर भाष्य केले आहे. कोरोना हा दैनंदिन जीवनाचा भाग होणार आहे हे मान्य करुनच आपण पुढील वाटचाल केली पाहिजे, असे यावेळी बोलताना पवार म्हणाले.

कोरोनावर विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना शरद पवार म्हणाले की, जगासमोर एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे आहे की इथून पुढे प्रत्येक नागरिकाची कोरोनासोबत जगायच्या संबंधीची आपली तयारी असली पाहिजे. कोरोना हा आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग होत आहे, अशी भूमिका तज्ज्ञांकडून मांडली गेली आहे. त्यामुळे आपण हे मान्य करायला हवे आणि ही परिस्थिती गृहित धरुन पुढे जाण्याच्या हिशोबाने नियोजन केले पाहिजे.

मागील काही महिन्यात घडलेल्या स्थितीवर पाठ्यपुस्तकात एखादा धडा असावा असेही पवार यावेळी म्हणाले. ते म्हणाले की, पाठ्यापुस्तकांमध्ये जे अभ्यासक्रम आहेत त्यामध्ये आपण मागील दोन अडीच महिन्याचा जो कोरोनाचा कालखंड आहे, त्यात जे अनुभव घेतले आहेत, त्यावर अशा परिस्थितीत काय काळजी, खबरदारी घ्यावी यासंदर्भातील एखादा दुसरा धडा असला पाहिजे.

पवार म्हणाले की, “मी काही तज्ज्ञांशी बोललो. त्यांच्या सांगण्यानुसार साधारणपणे जुलै महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापासून कोरोना ट्रेंड खाली जाईल. ऑगस्ट आणि सप्टेंबरपर्यंत पुर्ण तळाला जाईल आणि पुन्हा नॉर्मलन्सी येईल. मात्र याचा अर्थ कोरोना कायमचा संपला असे नाही. तो रिव्हर्सही येऊ शकतो. त्यामुळे या काळामध्ये आपल्याला कोरोनासंदर्भातील काळजी घ्यावी लागेल.

Leave a Comment